Eight senior IPS officers from Maharashtra including Ravindra Shisve and Sharda Nikam transferred


गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील आयपीएल पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना दिसत आहे. आठवड्याभरापूर्वी सहा आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यानंतर आता राज्यातील आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना दिसत आहे. आठवड्याभरापूर्वी सहा आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यानंतर आता राज्यातील आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रवींद्र शिसवे यांची बदली राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे. तर शारदा निकम यांची बदली अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. (Eight senior IPS officers from Maharashtra including Ravindra Shisve and Sharda Nikam transferred)

रवींद्र शिसवे हे मुंबईतील लोहमार्ग पोलीस आयुक्तपदी कार्यरत होते. मात्र आता त्यांची बदली राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे. शारदा निकम यांची अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. नागपूर शहराचे पोलीस सहआयुक्त निस्सार तांबोळी यांची बदली राज्य राखीव पोलीस दलाच्या महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त एन डी रेड्डी यांची बदली नागपूर शहराच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे. याशिवाय सुप्रिया पाटील यादव, राजीव जैन, अभिषेक त्रिमुखे आणि आरती सिंह यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आरती सिंह यांच्याही बदलीचे आदेश जारी करण्यात आले असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत.

हेही वाचा – MNS : मनसेकडून नालेसफाईची पोलखोल; व्हॉलीबॉल खेळत अनोखं आंदोलन

आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

रविंद्र शिसवे – सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग
शारदा वसंत निकम -विशेष पोलीस महानिरीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स
निस्सार तांबोळी – विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस दर
एन डी रेड्डी – पोलीस सहआयुक्त, नागपूर
सुप्रिया पाटील-यादव – विशेष पोलीस महानिरीक्षक, आस्थापना
राजीव जैन – विशेष पोलीस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा
अभिषेक त्रिमुखे – विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशासन
आरती सिंह – पदस्थापनेचे आदेश बाकी

हेही वाचा – Politics : अजित पवार गट वेगळा झाला होता, त्या कालखंडात मला देखील…; राष्ट्रवादीत जाण्याबाबत खडसे स्पष्ट बोलले



Source link

Comments are closed.