रशिया भारतात 'एस -500' ऑफर करते

अमेरिकन एफ-35 जेट, बी-2 बॉम्बर्ससाठी ‘काळ’

पाकिस्तान विरोधातील ऑपरेशन सिंदूरदरम्यान रशियन हवाई सुरक्षा यंत्रणेने स्वत:ची शक्ती दाखवून दिली आहे. रशियन हवाई सुरक्षा यंत्रणा एस-400 ने भारताची स्वदेशी हवाई सुरक्षा यंत्रणा आकाश आणि बराकसोबत मिळून पाकिस्तानने डागलेले सर्व ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र आकाशातच नष्ट केले आहेत. या पार्श्वभूमीवर रशियाने आता भारताला एस-500 हवाई सुरक्षा यंत्रणा ऑफर केली आहे. ही जगातील सर्वात अत्याधुनिक आणि शक्तिशाली हवाई सुरक्षा यंत्रणा आहे. रशियाची नेक्स्ट जनरेशन एअर डिफेन्स सिस्टीम ही स्टील्थ विमानापासून हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा मुकाबला करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. तसेच ती एस-400 पेक्षा अधिक शक्तिशाली असल्याचे रशियाकडून म्हटले गेले आहे.

एस-500 सिस्टीमची अद्भूत क्षमता

एस-400 मुख्यत्वे हाय-अल्टीट्यूड विमाने आणि क्रूज क्षेपणास्त्रांना लक्ष्य करते. तर एस-500 ला भविष्यातील युद्धभूमीसाठी डिझाइन करण्यात आहे. एस-500 हवाई सुरक्षा यंत्रणा बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs (600 किमीपर्यंतचा मारक पल्ला), हायपरसोनिक शस्त्रास्त्रs, लो ऑर्बिट उपग्रह, एफ-35 आणि बी-2 बॉम्बर सारख्या पाचव्या पिढीच्या विमानांच्या विरोधात उपयुक्त आहे. एस-500 यंत्रणा ही बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सुरक्षेसाठी 600 किलोमीटर तर हवाई लक्ष्यांसाठी 500 किलोमीटरपेक्षा अधिक कक्षेत प्रभावशाली आहे. ही यंत्रणा मॅक 20 पर्यंतच्या वेगाने झेपावत एकाचवेळी 10 हायपरसोनिक लक्ष्यांना ट्रॅक अन् एंगेज करू शकते.

एस-500 मध्ये इंटरसेप्टरचे मिश्रण वापरण्यात आले आहे. यात 77एन6-एन आणि 77एन6-एन1 क्षेपणास्त्रs (नवी अँटी-मिसाइल सीरिज) आहे, तसेच एस-400 प्रणालीचे वेरिएंट देखील आहे, जे याला अनेक प्रकारच्या धोक्यांच्या विरोधात  लवचिकता आणि मल्टीलेयर सुरक्षा प्रदान करते. याचबरोबर एस-500 ला ट्रकद्वारे सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते, यामुळे शत्रूला ही यंत्रणा सहजपणे लक्ष्य करता येत नाही.

रणनीतिक क्षेत्रांच्या सुरक्षेसाठी आदर्श प्रणाली

याचबरोबर ही कमांड सेंटर आणि आण्विक सुविधांसारख्या रणनीतिक क्षेत्रांच्या सुरक्षेसाठी एक आदर्श यंत्रणा आहे. एस-500 हवाई सुरक्षा यंत्रणा इंटीग्रेटेड एअर डिफेन्स नेटवर्क तयार करण्याच्या रणनीतिचा हिस्सा असून यात एस-400 दीर्घ पल्ल्याला व्यापते. एस-350 आणि पँट्सिर मध्यम आणि कमी पल्ल्याच्या धोक्यांच्या विरोधात काम करते आणि एस-500 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसोबत स्टील्थ लढाऊ विमाने आणि लोअर ऑर्बिट सॅटेलाइटपासून रक्षण करते. एस-500 सुरक्षा प्रणाली अमेरिकेची थाड आणि एजिस बीएमडी यासारख्या हवाई सुरक्षा प्रणालींशी स्पर्धा करत त्यांच्यापेक्षा वरचढ ठरते. खासकरून हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या विरोधात ही प्रणाली उपयुक्त आहे. एस-400 च्या तुलनेत सुमारे 60-70 टक्क्यांनी ही प्रणाली अत्याधुनिक असल्याचे सांगण्यात येते.

रशियाकडून ऑफर

रशियाने अधिकृतपणे भारताला एस-500 ‘प्रोमेटी’ एअर डिफेन्स सिस्टीमची ऑफर दिली आहे. परंतु भारताकडुन अद्याप यावर वक्तव्य करण्यात आलेले नाही. भारत एस-500 प्रणालीचा बहुधा पहिला ग्राहक ठरु शकतो, कारण भारत यापूर्वीच एस-400 चा वापर करत आहे. परंतु अद्याप कुठलाही औपचारिक करार झालेला नाही. चीनची हायपरसोनिक शस्त्रास्त्रs आणि सॅटेलाइट वॉरफेयरला तोंड देण्यासाठी एस-500 आवश्यक असल्याचे तज्ञांचे मानणे आहे. रशियाची एस-500 प्रणालीची ऑफर ही केवळ विक्रीपुरती मर्यादित नसून भारतासोबत संयुक्त उत्पादनाचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे.  रशियाचे उप-पंतप्रधान यूरी बोरिसोव यांनी भारत हा एस-500 चा पहिला ग्राहक ठरणार असल्याचे संकेत दिले आहेत. याच्या एका युनिटची किंमत 2.5 ते 3 अब्ज डॉलर्सदरम्यान राहण्याची शक्यता आहे. भारतीय चलनात 20-25 हजार कोटी रुपयांमध्ये याचे एक युनिट खरेदी केले जाऊ शकते.

Comments are closed.