सफाई मशीन रुळांवर कोसळली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मोठी दुर्घटना टळली
प्लॅटफॉर्म स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारी सफाई मशीन मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात अचानक रेल्वे रुळावर कोसळली. यावेळी मोटरमनने प्रसंगावधान दाखवत लोकल थांबवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे प्लॅटफॉर्म 7 वरील लोकल सेवा काही वेळ थांबवण्यात आली होती. या स्थानकातून दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात.
Comments are closed.