नेपाळ सीमेवर सतर्क सुरक्षा दल
हायटेक टू-व्हिलर पीव्हीआरने होतेय देखरेख
भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर उत्तरप्रदेशच्या सीमावर्ती भागात देखरेख वाढविण्यात आली आहे. भारत-नेपाळ सीमेला लागून असलेल्या राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट घोषित करण्यात आला आहे. याचनुसार श्रावस्ती जिल्ह्यात सीमेवर उदभवलेल्या विशेष स्थितीला विचारात घेत राज्य सरकारकडून 9 नव्या टू-व्हिलर पीआरव्ही वाहनांचे वितरण करण्यात आले आहे. याचा उद्देश सीमावर्ती क्षेत्रांमध्ये पोलीस गस्तला आणखी अधिक सक्षम करणे आणि संभाव्य गुन्हेगारी कारवायांवर प्रभावी नियंत्रण स्थापन करणे आहे.
सर्व पीआरव्ही वाहन जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, वायरलेस संचार व्यवस्था, बॉडी वॉर्न कॅमेरा, मोबाइल डाटा टर्मिनल एमडीटी, सीयूजी मोबाइल फोन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानांनी सुसज्ज आहेत. तसेच मेडिकल किट, हेल्मेट समवेत आवश्यक सुरक्षा उपकरणे उपलब्ध करविण्यात आली आहेत.
ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांचे अ•s उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. यामुळे बिथरलेल्या दहशतवादी संघटना आता नेपाळ सीमेवरून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. यासंबंधीचा अलर्ट पाहता सीमावर्ती भागातील सतर्कता वाढविण्यात आली आहे. याचबरोबर दहशतवाद्यांचे संशयित हस्तक आणि स्लीपर सेल्सवरील देखरेख वाढविण्यात आली आहे.
सीमेवर होणारी प्रत्येक हालचाल, संशयास्पद हालचालीची माहिती राज्य पोलीस मुख्यालयात पाठविली जात आहे. तसेच गुप्तचर यंत्रणांच्या इनपूटनंतर सीमावर्ती 7 जिल्ह्यांमध्ये विशेष दक्षता बाळगण्यात येत आहे. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे भारत-नेपाळ सीमेवर देखरेख ठेवली जात आहे. हाय रिझोल्युशन नाइट व्हिजन उपकरणांने युक्त ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नेपाळ सीमेवर 24 तास नजर ठेवली जात आहे. लखीमपूर, बहराइच, श्रावस्ती, बलरामपूर, सिद्धार्थ नगर आणि महाराजगंज या जिल्ह्यांमध्ये पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे.
Comments are closed.