ऑपरेशन सिंदूरची माहिती प्रत्येक खासदाराला मिळावी, कारण खासदारच जनतेचा खरा प्रतिनिधी; शरद पवारां

शरद पवार वर कॉंग्रेस: ऑपरेशन सिंदूरमध्ये (Operation Sindoor) काय घडले हे प्रत्येक खासदाराला जाणून घेण्याचा अधिकार आहे. कारण खासदार हाच लोकांचा खरा प्रतिनिधी आहे, असे म्हणत काँग्रेसने (Congress) राष्ट्रवादी शरद पवारचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भूमिकेपासून वेगळी भूमिका घेतली आहे. देशाचे सैन्य कुठल्या पक्षाचे नाही, तर ती पूर्ण देशाची सेना आहे, हेही सरकारने लक्षात ठेवावे, असेही काँग्रेसने म्हंटले आहे.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ला तसेच त्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर संदर्भात देशाला सखोल माहिती देण्यासाठी सरकारने संसदेचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संसदेचा विशेष सत्र बोलावण्याची गरज नाही, तर पंतप्रधानांनी प्रमुख पक्षातील काही प्रमुख लोकांना बोलावून माहिती देणे ही पुरेसे ठरेल असे वक्तव्य केले होते.

प्रत्येक खासदाराला ऑपरेशन सिंदूरची माहिती मिळावी

आता काँग्रेसने शरद पवार यांच्या भूमिकेशी वेगळी भूमिका घेत संसद हेच देशाचं सर्वोच्च व्यासपीठ आहे. तसेच सरकारकडून एखाद्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना माहिती मिळण्याऐवजी प्रत्येक खासदाराला ऑपरेशन सिंदूरची इत्यंभूत माहिती दिली पाहिजे, कारण खासदारच लोकांचे प्रतिनिधित्व करतात, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी व्यक्त केले आहे.

शरद पवार यांचे सूर वेगळे असले तरी…

देशावर एवढे मोठे संकट आले असताना विरोधी पक्षांना विश्वासात घेतले हवे होते. सरकारने विरोधी पक्षांसोबत दोन बैठका घेतल्या. मात्र दोन्ही बैठकीत पंतप्रधान अनुपस्थित राहिले, हे दुर्दैवी असल्याचे मुत्तेमवार म्हणाले. जनतेच खरं प्रतिनिधित्व देशातील 542 खासदार करतात. त्यामुळे त्यांच्या शंकेचे निरसन झालेच पाहिजे. शरद पवार यांचे सूर वेगळे असले तरी पंतप्रधानांनी स्वतः सर्व माहिती द्यावी, अशीच त्यांची ही अपेक्षा आहे. देशावर दहशतवाद आणि पाकिस्तानचे संकट घोंगावत असताना सैन्याने ते कंट्रोल केले. ती सेना कुठल्या पक्षाची नव्हे, तर देशाची सेना आहे याची आठवणही काँग्रेसने करून दिली आहे. आम्हाला वाटेल तेव्हा मीटिंग घेऊ, इच्छा झाली तर त्यात येऊ, आवश्यक वाटले तरच सांगू, सरकारचे असे वागणे योग्य नाही, असंही काँग्रेसने म्हटलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

आणखी वाचा

NCP Crisis Ajit Pawar & Sharad Pawar: शरद पवारांना वारं फिरल्याची जाणीव झाली अन् अजितदादांसोबत युतीच्या हालचालींना सुरुवात?

अधिक पाहा..

Comments are closed.