रवींद्र जडेजाचा महारेकाॅर्ड! अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव अष्टपैलू

स्टार क्रिकेटर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आयसीसी कसोटी अष्टपैलू क्रमवारीत एक भीमपराक्रम केला आहे. हा असा पराक्रम आहे जो क्वचितच मोडला जातो. भारतीय संघाचा हा स्टार अष्टपैलू खेळाडू आयसीसी कसोटी अष्टपैलू क्रमवारीत बऱ्याच काळापासून पहिल्या स्थानावर आहे. त्याने रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे. (9 मार्च 2022) पासून जडेजा सतत अव्वल स्थानावर आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलिस, कपिल देव आणि इम्रान खान सारख्या खेळाडूंना मागे टाकले आहे. या फॉरमॅटमध्ये बाॅल आणि बॅटसह जडेजाची सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी याचा पुरावा आहे.

गेल्या वर्षी रवींद्र जडेजाने 29.27च्या सरासरीने 527 धावा करत आपली अष्टपैलू प्रतिभा दाखवली. आणि 24.29च्या सरासरीने 48 विकेट्स घेतल्या. इंग्लंड, बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या विजयात त्याच्या कामगिरीने महत्त्वाची भूमिका बजावली. आयसीसी कसोटी अष्टपैलू क्रमवारीत जडेजाचे राज्य आता 1,151 दिवसांपर्यंत वाढले आहे. तो इतिहासातील सर्वात जास्त काळ नंबर वन कसोटी अष्टपैलू खेळाडू बनला आहे. त्याच्या 400 रेटिंग गुणांमुळे तो बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजपेक्षा पुढे आहे, जो 327 गुणांसह त्याच्या अगदी मागे आहे. 36 वर्ष वय ओलांडूनही जडेजाचे वर्चस्व कायम आहे.

जडेजाने 80 कसोटी सामन्यांमध्ये 3,370 धावा केल्या आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी 34.74 आहे. डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजीने जडेजाने 323 विकेट्स घेतल्या आहेत. गोलंदाजीत जडेजाची सरासरी 24.14 आहे. आर. अश्विनच्या निवृत्तीनंतर, आगामी इंग्लंड दौऱ्यात जडेजा भारतासाठी ट्रम्प कार्ड असेल.

Comments are closed.