भारताच्या 'गोल्डन बाॅय'ला भारतीय सैन्यात मिळालं मोठं पद..! ही जबाबदारी सांभाळणार

भारताचा गोल्डन बाॅय नीरज चोप्राला (Neeraj Chopra) भारतीय सैन्यात मोठी जबाबदारी मिळाली आहे. नीरज चोप्राला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आली आहे. नीरज चोप्रा हा भालाफेकमध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. नीरजने टोकियो ऑलिंपिक 2021 मध्ये भारतासाठी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. आता त्याला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलची पदवी देण्यात आली आहे.

नीरज चोप्रा यांचा समावेश भारताच्या प्रादेशिक सैन्य नियमन, 1948 च्या पॅरा-31 अंतर्गत करण्यात आला आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना लेफ्टनंट कर्नलची पदवी दिली आहे. यापूर्वी नीरज राजपुताना रायफल्समध्ये सुभेदार पदावर होता. नीरज 2016 मध्ये नायब सुभेदार म्हणून भारतीय सैन्यात सामील झाला.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून नीरज चोप्राने इतिहास रचला होता. देशासाठी वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला ट्रॅक अँड फील्ड अॅथलीट ठरला. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर अंतर गाठून पहिले स्थान मिळवून सुवर्णपदक जिंकले. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले.

नीरजने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्येही भारतासाठी रौप्यपदक आणले. ऑलिम्पिकमध्ये सलग 2 पदके जिंकल्यानंतर नीरज चोप्राला अनेक जाहिरातींच्या ऑफर मिळाल्या आहेत. यामुळे त्याच्या कमाईत वाढ होते. नीरजने 2025 मध्ये व्यावसायिक टेनिसपटू हिमानी मोरशी लग्न केले. नीरजपूर्वी अनेक खेळाडू प्रादेशिक सैन्याचा भाग आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) देखील प्रादेशिक सैन्यात आहे.

Comments are closed.