पाकिस्तानी गुप्तचर पनीपातमध्ये अटक
सोशल मीडियाद्वारे पाठवित होता माहिती
हरियाणा पोलिसांनी एक मोठी कारवाई करत पानिपतच्या सेक्टर-13/17 मधून एका पाकिस्तानी हेराला अटक केली आहे. आरोपीचे नाव नौमान ईलाही (28 वर्षे) असून तो मूळचा उत्तरप्रदेशच्या शामली जिल्ह्यातील कैराना येथील रहिवासी आहे. नौमान पाकिस्तानातील दहशतवादी इक्बालच्या संपर्कात होता आणि तो व्हॉट्सअॅप तसेच अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून भारतासंबंधीची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होता. दीर्घकाळापासून पाकिस्तानच्या हँडलरच्या संपर्कात असल्याची कबुली आरोपीने चौकशीत दिली आहे. आरोपीकडून हस्तगत मोबाइल फोन आणि डिजिटल सामग्रीची फॉरेन्सिक तपासणी करविली जात आहे. याचबरोबर आरोपीने कुठल्या शासकीय संस्था आणि ठिकाणांची माहिती पुरविली याचा शोध घेतला जात असल्याचे हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलदीप यादव यांनी सांगितले आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक मोबाइल फोन, लॅपटॉप आणि काही दस्तऐवज हस्तगत केले आहेत. प्रारंभिक तपासात अनेक सुगावे हाती लागले आहेत. त्याचा संबंध एका मोठ्या नेटवर्कशी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तपास यंत्रणा आता या प्रकरणाला राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित पैलूच्या अंतर्गत गांभीर्याने घेत आहेत. आरोपीचे मागील संपर्क आणि हालचालींबद्दल माहिती जमविली जात असल्याचे सांगण्यात आले.
Comments are closed.