चीनला आमंत्रित केले गेले नाही, तुर्की आले नाही.

भारताच्या शत्रू अन् मित्रदेशांची पटली ओळख

म्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केल्यावर भारताने याच्या गुन्हेगारांना धडा शिकविण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले होते. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी अ•dयांना नष्ट केले होते. भारताच्या या कारवाईनंतर जागतिक समुदायाला भारतीय सैन्य शक्तीची प्रचिती आली.  भारताने स्वत:चे है सैन्य जागतिक व्यासपीठावर मांडले आहे. याकरता संरक्षण मंत्रालयाने दिल्लीत असलेल्या 70 देशांच्या डिफेन्स अताशेंना (संरक्षण प्रतिनिधी) एका खास ब्रीफिंगमध्ये बोलाविले. परंतु सर्वात मोठा संदेश म्हणजे या यादीत चीनला नव्हता. तर पाकिस्तानचा निकटवर्तीय तुर्कियेला बोलाविण्यात आले, परंतु त्याने यात सहभागी होणे महत्त्वाचे मानले नाही.

चीन हा पाकिस्तानचा सर्वात घनिष्ठ सैन्य भागीदार आणि त्याचा ‘ऑल वेदर फ्रेंड’ म्हणजेच सदाबहार मित्र आहे. चीनच्या शस्त्रास्त्रांच्या मदतीनेच पाकिस्तान भारताला आव्हान देऊ पाहतो. याचमुळे भारताने चीनला या ब्रीफिंगपासून पूर्णपणे दूर ठेवले. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय वायुदलाने पाकिस्तानातील चिनी हवाई सुरक्षा यंत्रणेलाच उद्ध्वस्त केले होते, याचमुळे त्याची माहिती चीनसमोर मांडता येणार नव्हती. पाकिस्तानचा दुसरा मित्रदेश तुर्कियेला ब्रीफिंगसाठी बोलावियण्त आले, परंतु त्याने या ब्रीफिंगमध्ये सामील होण्यास नकार दिला. तर तुर्कियेने या ब्रीफिंगमध्ये एका कनिष्ठ अधिकाऱ्याला पाठविण्याचा निर्णय घेतला होता, हे स्तरहीन प्रतिनिधित्व मान्य नसल्याचे भारताने स्पष्ट केले. याचा अर्थ भारत आता कूटनीतिक स्वरुपातही कोण मित्र आणि कोण शत्रू हे निश्चित करत आहे.

कूटनीतिक स्तरावरही मजबूत

या ब्रीफिंगदरम्यान पाकिस्तानच्या दुष्प्रचाराची पोलखोल करण्यात आली. भारताने कशाप्रकारे माहितीयुद्धात पाकिस्तानला पिछाडले आणि जागतिक व्यासपीठावर अचूक तथ्यांसह स्वत:चे म्हणणे मांडले हे देखील 70 देशांच्या प्रतिनिधींना दाखविण्यात आले. भारत आता केवळ सीमांवर नव्हे तर कूटनीतिक स्तरावरही स्वत:ची स्थिती मजबूत करत असल्याचे या पूर्ण घटनाक्रमामुळे पुन्हा स्पष्ट झाले आहे. चीनला दूर ठेवत आणि तुर्कियेच्या वर्तनाबद्दल कठोर भूमिका घेत भारताने आता मित्र आणि शत्रूची ओळख स्वत:चा अनुभव, सुरक्षा हित आणि रणनीतिक प्राथमिकतांच्या आधारावर स्वत:च करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

जगाने पाहिले भारताचे सामर्थ्य

या महत्त्वपूर्ण ब्रीफिंगमध्ये लेफ्टनंट जनरल डी.एस. राणा यांनी 70 देशांच्या प्रतिनिधींना ऑपरेशन सिंदूरच्या यशाविषयी सांगितले. कशाप्रकारे सैन्य, वायुदल, नौदलासोबत अंतराळ, सायबर आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेयरच्या संयुक्त शक्तीचा वापर करत दहशतवाद्यांच्या अ•dयांना लक्ष्य करण्यात आले याची माहिती राणा यांनी दिली. ही कारवाई केवळ दहशतवाद्यांच्या विरोधात होती, कुठल्याही देशाच्या सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात नव्हती असे राणा यांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed.