पुढच्या 24 तासांत मुंबईत पावसाची हजेरी, हवामान विभागाचा इशारा

फोटो – रूपेश जाधव

पुढच्या 24 तासांत मुंबईत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच मुंबईत यावेळी ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहतील अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज. शहर आणि उपनगरातील तुरळक ठिकाणी ढगाळ आकाशासह हलका पाऊस आणि ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34°C आणि 26°C च्या आसपास असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Comments are closed.