WTC 2025 फायनल विजेत्या संघासाठी ICC कडून मोठ्या बक्षिसाची घोषणा, बक्षिसाची रक्कम ऐकून थक्क व्हाल!
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघात होणाऱ्या लॉर्ड्स येथील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्याआधी आयसीसीने बक्षीसाची रक्कम घोषित केली आहे. डब्ल्यूटीसी 2023 ते 2025 फायनलसाठी एकूण बक्षिसाची रक्कम 5.76 मिलियन अमेरिकन डॉलर्स आहे.
आता चॅम्पियन संघाला 3.6 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 30.78 करोड रुपयांचे बक्षीस मिळणार आहे, जे की 2021 आणि 2023 दोन्ही वेळेस दिल्या गेलेल्या 1.6 अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक जास्त आहे. तसेच उपविजेत्या संघाला 18.46 करोड रुपये मिळणार आहेत.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघात डब्ल्यूटीसीचा फायनल सामना 11 जून ते 15 जून दरम्यान खेळला जाणार आहे. आयसीसीने या सामन्यासाठी एक प्रचाराचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा, वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा, स्टार फलंदाज एडेन मार्क्रम, ऑस्ट्रेलियाचा शानदार खेळाडू स्टीव स्मिथ आणि सलामीवीर फलंदाज ट्रेविस हेड सोबत माजी खेळाडू शॉन पोलक, डेल स्टेन, मैथ्थू हेडन, मेल जोन्स, नासिर हुसेन, शोएब अख्तर आणि रवी शास्त्री यांचा समावेश आहे.
साऊथ आफ्रिका संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या पॉईंट्स टेब मध्ये टॉपच्या स्थानी राहिलेला आहे आणि लॉर्ड्समध्ये होणाऱ्या फायनलसाठी स्थान मिळवणारी पहिली टीम ठरली आहे. हे त्यांनी पाकिस्तान वेस्टइंडीज बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध मालिका जिंकून आणि भारताविरुद्ध घरेलू मालिका जिंकून केले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघावर 3-1 विजय मिळवत फायनलमध्ये जागा मिळवली. त्यांच्या या मजबूत कामगिरीमध्ये पाकिस्तानला त्यांनी त्यांच्या घरेलू मैदानावर 3-0 ने मात दिली. त्याचबरोबर न्यूझीलंड आणि श्रीलंका विरुद्ध देखील त्यांनी मालिका जिंकली होती.
Comments are closed.