Weather Forecast – तो येतोय बरं का…! हवामान विभागाने दिला पुढच्या 4 आठवड्यांचा अंदाज
राज्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. कोकण किनारपट्टीसह अनेक भागात पावसाची कोसळधार सुरू आहे. पावसाचा जोर पुढील 4-5 दिवस असाच राहिल, तसेच जोरदार वारे देखील वाहतील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाना पुढील चार आठवड्यांचा अंदाज वर्तवला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत या बाबत माहिती दिली आहे.
पुढील 4-5 दिवसांत मेघगर्जने दरम्यान बाहेर पडणे टाळा. झाडाखाली उभे राहू नका, तसेच सुरक्षिततेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
15 मे 15 रोजी मी बिगीची तयारी करणार आहे.
🌨🌨🌦🌱🌈☔☔
येत्या 4 आठवड्यातील पावसाचे विस्तारित पूर्वानुमान: pic.twitter.com/7SI5DOX1GF
– केएस होसलीकर (@होसलीकर_के) 15 मे, 2025
पुढील चार आठवड्यांचा काय आहे अंदाज?
पहिला आठवडा 15 मे ते 22 मे – हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पहिल्या आठवड्यात दक्षिण भारत, महाराष्ट्र, ओडिशा व ईशान्य भारतातील अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दुसरा आठवडा 22 मे ते 29 मे – या आठवड्यात पश्चिम किनाऱ्यावर जास्त पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण भारत, महाराष्ट्र, पूर्व भारतातील अनेक भाग, छत्तीसगड, पूर्व उत्तर प्रदेश आणि NMMT प्रदेशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढच्या 24 तासांत मुंबईत पावसाची हजेरी, हवामान विभागाचा इशारा
तिसरा आठवडा 29 मे ते 5 जून – कर्नाटक, ईशान्य BoB या किनारी प्रदेशात जास्त सकारात्मक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र वायव्य भारत, तामिळनाडू वगळता देशातील बहुतेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
चौथा आठवडा 5 जून ते 12 जून – कोकण किनारपट्टीसह पूर्व भारत, मध्य भारत, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक आणि केरळच्या किनारी प्रदेशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
https://www.saaamana.com/more-than-16-थौक-कायक्टर- क्रॉप-डॅमज-इन-अनसॉन्सनल-रेन/
Comments are closed.