भारतीय संघाचे प्रशिक्षक सिद्धिविनायकाच्या चरणी! इंग्लंड दौऱ्याआधी घेतला आशीर्वाद
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मुंबईच्या सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन त्यांच्या पत्नी नताशा जैन समवेत मंदिरात पूजा केली. भारतीय संघाचे प्रशिक्षक भारताच्या इंग्लंड दौऱ्याआधी बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. गंभीर यांनी त्यांच्या पत्नीसोबतचा मंदिरातील फोटो एक्सवर शेअर केला आहे.
भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेआधी गौतम गंभीर यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेतला आहे. भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध पहिला सामना 20 जून रोजी खेळणार आहे. भारताची ही मालिका 4 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. भारत आणि इंग्लंड संघात 2024 मध्ये सुद्धा 5 सामन्यांची मालिका झाली होती. ज्यामध्ये भारताने 4- 1 ने आघाडी घेतली होती.
भारताच्या इंग्लंड दौऱ्याआधी अजून टीम इंडियाचा संघ घोषित होणे बाकी आहे. याआधी भारताचा कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने 7 मे रोजी या फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर विराट कोहलीने देखील 12 मे रोजी निवृत्ती जाहीर केली. भारताच्या इंग्लंड जाण्याआधी या दोन्ही दिग्गजांनी कसोटी क्रिकेटला राम राम ठोकला. तसेच टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर देखील दोन्ही खेळाडूंनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली होती.
रोहित शर्माने आणि विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सध्या दोन्ही खेळाडू आयपीएल 2025 मध्ये टी20 क्रिकेट खेळत आहेत.
Comments are closed.