Nail Polish : स्किनटोननुसार निवडा नेलपॉलिश
चेहऱ्याप्रमाणे हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी पार्लरमधील विविध ट्रिटमेंट घेण्यात येतात. काही महिला तर दर काही दिवसांनी मेन्युकेअर करून घेतात. हात मऊ मुलायम दिसावेत यासाठी महागडे क्रिम्स, लोशन्स वापरण्यात येतात. कुठेही बाहेर जाताना चेहऱ्याप्रमाणे हातही सुंदर दिसावेत यासाठी हातात विविध रिंग्स, बांगड्या, ब्रेसलेट वापरले जातात. यासोबत हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणखी एक गोष्ट केली जाते, ती म्हणजे नेलपॉलिश लावली जाते. पण, नेलपॉलिश लावताना स्किनटोन लक्षात घेणे आवश्यक आहे, जेणेकरून हात खराब दिसणार नाही. आज आपण जाणून घेऊयात नेलपॉलिश स्किनटोननुसार कशी निवडायची.
गोरी त्वचा –
गोऱ्या रंगाच्या स्कीनसाठी गडद निळा, लाल, मजेंटा, केशरी असे रंग शोभून दिसतात. या रंगाच्या नेल पॉलिश शेड्स गोऱ्या रंगावर खुलून दिसतात. तुम्हाला असे गडद रंगाचे शेड्स नको असतील तर तुम्ही ट्रान्सपरंट नेलपॉलिश लावू शकता.
सावळ्या रंगाची त्वचा –
जर तुमचा स्किनटोन डस्की अर्थात सावळा असेल तर ब्राइट आणि वायब्रट रंगाच्या नेलपॉलिश लावायला हव्यात. यात तुम्ही गुलाबी, पिवळा, केशरी, सिल्वर, गोल्डन रंग वापरू शकता. या रंगामुळे तुमची स्कीन उजळलेली दिसते.
गडद त्वचा-
गडद वर्ण असलेल्या महिलांचे कायम रंगावरून आम्हाला काहीच चांगले दिसत नाही, असे म्हणणे असते. पण, हे पूर्णपणे चुकीचे आहे. तुमची स्कीनटोन गडद असेल तर गडद लाल, गुलाबी, नियॉन रंगाच्या नेलपॉलिश तुम्हाला छान दिसतील.
वरील माहितीच्या आधारे तुम्ही स्किनटोननुसार नेलपेंट लावू शकता. पण, हल्ली बाजारात विविध प्रकारच्या नेलपेंट उपलब्ध आहेत. जसे की, मॅट, शीअर फिनिश, ग्लॉसी, क्रिमी, ग्लिटरी, मेटॅलिक, टेक्सचर्ड फिनिश. तुम्ही तुमच्या त्वचेच्याटोननुसार नेलपेंटची निवड करू शकता आणि हातांचे सौंदर्य वाढवू शकता.
हेही पाहा –
Comments are closed.