A 22-year-old girl from Pune’s Hadapsar area committed suicide within a month after being harassed for dowry


51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी देऊनही सासकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने 16 मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ताजी असतानाच आता पुणे शहरातील हडपसर परिसरातून आणखी विवाहितेने मनासारखा हुंडा न दिल्याने सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे : 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी देऊनही सासकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने 16 मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ताजी असतानाच आता पुणे शहरातील हडपसर परिसरातून आणखी विवाहितेने मनासारखा हुंडा न दिल्याने सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळींविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A 22-year-old girl from Pune’s Hadapsar area committed suicide within a month after being harassed for dowry)

हडपसर पोलिसांनी सांगितले की, मृत दीपा ऊर्फ देवकी पुजारी (22) आणि प्रसाद यांचा विवाह मागील महिन्यात 18 एप्रिल रोजी विजयपूर येथील बागेवाडीतील बसव मंगल कार्यालयात पार पडला होता. या लग्न सोहळ्यासाठी दीपाच्या घरच्यांनी 10 लाख रुपये खर्च केले होते. तसेच प्रसादला हुंडा म्हणून 4 तोळे सोने दिले होते. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दीपा पुण्यात आली. मात्र त्याच दिवसापासून प्रसाद आणि त्याची आई सुरेखाने लग्नात भांडी, फ्रीज दिले नाही, आमचा मानपान केला नाही असे बोलून वाद घालू लागले. तसेच दीपाला शिवीगाळही केली. त्यामुळे दीपाने माहेर गाठत आपल्या वडिलांना माहेरच्या मंडळींच्या त्रासाबाबत माहिती दिली.

हेही वाचा – Supriya Sule : ताई म्हणतात दादांचा संबंध नाही; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

परंतु दीपाच्या सासऱ्याने तिची समजून घातली पुन्हा पुण्याला घेऊन आले. मात्र 18 मे रोजी दीपाने वडिलांना फोन करून रडताना सांगितले की, लग्नात भांडी, सामान दिले नाही म्हणून पती प्रसाद, दीर, सासू आणि सासरे शिवीगाळ करून मारहाण करत असल्याचे सांगितले. यावर दीपाच्या वडिलांनी तिची समजूत काढताना सांगितले की, मी पुण्याला येतो आणि तुमच्यातील वाद सोडविण्याचा प्रयत्न करतो. पण, 19 मे रोजी दीपाने हडपसरमधील वास्तव्यास असलेल्या आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

दीपाने आत्महत्या केल्याची माहिती समजताच तिचे वडील गुरुसंगप्पा म्यागेरी यांच्या पायाखालची वाळू सरकली. दीपाच्या वडिलांनी तिच्या पतीसह सासू, सासरे आणि दीर यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी दीपाचा पती प्रसाद चंद्रकांत पुजारी, दीर प्रसन्ना चंद्रकांत पुजारी, सासू सुरेखा चंद्रकांत पुजारी आणि सासरे चंद्रकांत पुजारी यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून हडपसर पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा – Vaishnavi Hagawane Suicide Case : निचपणाचा कळस; कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सामंतांकडून संताप व्यक्त



Source link

Comments are closed.