शतक झळकावल्यानंतर सेलिब्रेशन करण्यासाठी उडी घेतली आणि… पहा VIDEO
गॉलमध्ये सुरू असलेल्या श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश या पहिल्या कसोटी सामन्यात बांग्लादेशने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 ला शानदार सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी खेळ संपेपर्यंत त्यांनी 3 विकेट्सच्या मोबदल्यात 292 धावा केल्या आहेत. (WTC 2025-27 Bangladesh start)
टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या श्रीलंकेने सुरुवातीला चांगली कामगिरी करत बांग्लादेशला 45 धावांवर 3 विकेट्सचा फटका दिला. थारिंदु रत्नायकेने सुरुवातीला तुफानी मारा करत बांग्लादेशला संकटात टाकलं. (Galle Test Match updates)
मात्र चौथ्या विकेट्ससाठी नजमुल हुसैन शांतो (136)) आणि मुशफिकुर रहीम (105) यांनी नाबाद 247 धावांची भागीदारी करत बांग्लादेशला मजबूत स्थितीत नेलं.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये शांतो शतक पूर्ण करताना आनंदाने हवेत उडी घेतो, आणि त्याच वेळी एक चेंडू जोरात त्याच्याकडे येतो. शांतो अगदी थोडक्यात त्या चेंडूपासून वाचतो आणि नंतर हसत आपले सेलिब्रेशन पूर्ण करतो. हा क्षण मजेशीर तर होता, पण त्यातून मैदानावरील त्याचा आत्मविश्वास आणि जोशही दिसून आला. (Najmul Hossain Shanto century celebration)
पुढील स्तरीय उत्सव 🔥🔥🤣
सेलिब्रेशन वॉर जेन लेज थी#एसएलव्हीबॅन pic.twitter.com/iq1oy8a1lf– शाह जहान 56 (@शाहजहानबा 56) 17 जून, 2025
या कसोटी सामन्याचे श्रीलंकेसाठी खास महत्त्व आहे कारण हा अँजेलो मॅथ्यूजचा अखेरचा कसोटी सामना आहे. या सामन्यानंतर श्रीलंकेचा हा अनुभवी अष्टपैलू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. मात्र त्याच्या निरोपाच्या सामन्यात विजय देण्यात श्रीलंकन गोलंदाज अपयशी ठरत आहेत. (Angelo Mathews last Test)
Comments are closed.