ऑस्ट्रेलियाला मोठा झटका – भारताविरुद्धच्या सामन्याआधी स्टार सलामीवीर फलंदाज स्पर्धेबाहेर!

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये 4 मार्च रोजी होणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज मैथ्यू शॉर्ट स्पर्धेच्या बाहेर पडला आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेटने अष्टपैलू सलामीवीर फलंदाज मैथ्यू शॉर्टच्या जागी दुसऱ्या खेळाडूच्या नावाची घोषणा केली आहे. त्याच्याजागी संघात अष्टपैलू कूपर कोनोलीला स्थान देण्यात आले आहे. तसेच भारतीय संघाविरुद्ध उपांत्य फेरी सामन्यात ट्रेविस हेड एका नव्या खेळाडू सोबत डावाची सुरुवात करेल.

वैश्विक स्पर्धेत कोणत्याही संघाला जर संघात बदल करायचा असेल तर पहिल्यांदा आयसीसी कडून औपचारिक परवानगी घ्यावी लागते. ऑस्ट्रेलिया क्रिकेट व्यवस्थापनाने मैथ्यू शॉर्टच्या जागी कूपर कोनोलीच नाव पाठवलं होत त्यासाठी आयसीसी ने मान्यता दिली आहे .

भारतीय संघाविरुद्ध सामन्यात मैथ्यू शॉर्ट खेळणार नाही. अशातच ट्रेविस हेड सोबत ओपनिंग करण्यासाठी दोन फलंदाज‌ दावेदार आहेत. संघ युवा फलंदाज जैक फ्रेजर मैकबर्गला डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी सोपवू शकतो. याशिवाय संघामध्ये वेगवान अष्टपैलू आरोण‌ हार्डी देखील सामील आहे, त्यामुळे त्यालाही ही संधी मिळू शकते. आरोण‌ हार्डीमुळे संघातील गोलंदाजी खूप मजबूत झाली आहे. आता हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे की, कर्णधार स्टीव स्मिथ कुणाला संधी देणार ?

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये उपांत्य फेरीतील सामना दुबईच्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पुन्हा एकदा भारतीय संघ चार फिरकीपटूं सोबत मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. तसेच ऑस्ट्रेलिया संघात एडम जम्पा एक मुख्य फिरकीपटू आहे. त्याचबरोबर ग्लेन मॅक्सवेल, ट्रेविस हेड, आणि मार्नस लाबुशेन फिरकी गोलंदाजी करू शकतात.

हेही वाचा

केकेआरचं नेतृत्व मिळाल्यानंतर रहाणे भावुक! म्हणाला, “ही माझ्यासाठी सन्मानाची….

रिषभ पंतचा जागतिक सन्मान.! ‘लॉरेस कमबॅक ऑफ द इयर’साठी नामांकन

वनडेमध्ये ‘या’ 3 भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध दाखवला दम! आकडेवारी शानदार

Comments are closed.