पाकिस्तान सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका ? विराट कोहलीला सरावादरम्यान दुखापत

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ शुक्रवारी दुबईच्या आयसीसी अकॅडमी मध्ये सराव करत होते. विराट कोहली संघाच्या बाकी खेळाडूंच्या आधी एक तास सरावाच्या ठिकाणी पोहोचला होता. त्याने खूप मेहनतीने सराव केला, पण यादरम्यान त्याच्या पायाला एक चेंडू लागला त्यामुळे त्याच्या पायाला आईस पॅक लावण्यात आला.

भारत पाकिस्तान सामन्यासाठी संपूर्ण संघाने जीव तोडून सराव केला. काही खेळाडू विराट सोबत मैदानावर येऊन वेळेच्या आधी येऊन सराव करत होते. विराटच्या पायाला जेव्हा चेंडू लागला तेव्हा तो मैदान सोडून बाहेर गेला होता. त्यानंतर काही वेळाने सरावासाठी पुन्हा तो मैदानावर परत आला. भारतीय संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे त्याची दुखापत जास्त गंभीर नाही. त्यामुळे उद्याच्या सामना खेळण्यासाठी तो मैदानावर उपस्थित राहील.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्याआधी इंग्लंडच्या विरुद्ध वनडे मालिका खेळताना दुखापतीच्या कारणाने विराट कोहली खेळू शकला नव्हता. त्यावेळी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती त्यामुळे तो संघाबाहेर होता.

विराट कोहलीची बॅट पाकिस्तान विरुद्ध खेळताना कमालीची चालते. यामुळे चाहत्यांना आशा आहे की, विराट कोहलीचा फॉर्म उद्याच्या सामन्यादरम्यान परत येईल आणि विराट एका मोठ्या धावसंख्येची पारी तो खेळेल.

विराटच्या एकदिवसीय क्रिकेट करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 298 सामन्यांमध्ये 13985 धावा केल्या आहेत. विराट कोहलीला 14,000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 15 धावांची आवश्यकता आहे.  जर त्याने हा टप्पा पार केला तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वेगाने 14 हजार धावा करणारा खेळाडू ठरेल. तसेच तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल. सचिन तेंडुलकरने 359 सामन्यांच्या 350 व्या डावामध्ये हा आकडा पार केला होता.

हेही वाचा

माजी दिग्गजाने विराट कोहलीच्या फाॅर्मविषयी व्यक्त केली चिंता! म्हणाला…

भारत विरुद्ध पाकिस्तान: शेवटच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात कोण चमकले, कोण झाले नामोहरम?

भारत-पाकिस्तान दुबईत समोरासमोर .,केव्हा कुठे पाहता येणार लाईव्ह सामना जाणून घ्या एका क्लिकवर

Comments are closed.