A bike fell off a bridge near hotel; a youth was killed; one was injured


भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलावरून खाली कोसळली. त्यात दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना सोमवारी (दि.२८) पहाटे गंगापूर येथील गंमत जंमत हॉटेलजवळील पुलावर घडली. या अपघातात दुचाकीवरील दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. (A bike fell off a bridge near hotel; a youth was killed; one was injured)

जयराम आर. सहानी (४२, रा. गोरखपूर, उत्तरप्रदेश, सध्या रा. आसारामबापू आश्रमजवळ, गंगापूररोड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. नाशिक तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहानी व त्यांचा जोडिदार गिरणारे कडून नाशिकच्या दिशेने दुचाकीवरून येत हाेते. त्यावेळी भितींवर दुचाकी आदळून दोघे पुलावरून खाली पडले. त्यात गंभीर मार लागल्याने सहाणी यांचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही असे पोलिसांनी सांगितले.



Source link

Comments are closed.