निवृत्तीनंतर ‘या' ऑस्ट्रेलियन खेळाडूचं नव्या लीगमध्ये पदार्पण, पहिल्याच सामन्यात केली गोलंदाजांची धुलाई!

सध्या अमेरिकेमध्ये मेजर क्रिकेट लीग स्पर्धा सुरू आहे. अनेक देशातील खेळाडू या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत आहेत, तसेच टेक्सास सुपर किंग्स (Texas Super Kings vs Seattle Orcas) आणि सीएटल ओर्कास यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया अष्टपैलू खेळाडूचं धमाकेदार प्रदर्शन पाहायला मिळालं. वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर या खेळाडूने मेजर क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि पदार्पण सामन्यातच विरुद्ध संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. हा खेळाडू म्हणजे मार्कस स्टॉईनीस (Marcus Stoinis). जो मेजर लीग क्रिकेटमध्ये त्याचा पहिला हंगाम खेळत आहे.

मेजर लीग क्रिकेटच्या त्याच्या पहिल्या हंगामात मार्कस स्टॉईनीस (Marcus Stoinis) टेक्सास सुपर किंग्स संघाचा भाग आहे. या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करत फक्त 12 चेंडू 28 धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने 4 शानदार षटकार झळकावले. तसेच या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 233.33 राहिला होता. याशिवाय गोलंदाजी करताना त्याने 2 षटकात 4 धावा देऊन 1 विकेट सुद्धा घेतली.

मार्कस स्टॉईनीसने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions trophy) आधीच फेब्रुवारीमध्ये वनडे आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर आयपीएलमध्ये (IPL 2025) सुद्धा त्याने शानदार प्रदर्शन केले. आयपीएल 2025 मध्ये त्याने फलंदाजी करताना 160 धावा केल्या होत्या, याशिवाय गोलंदाजीमध्ये 4 विकेट सुद्धा त्याच्या नावावर केल्या.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सुपर किंग्सने 20 षटकात 6 खेळाडू गमावून 153 धावा केल्या. ज्यामध्ये साई तेजाने 30 धावा स्टॉईनीसने 28 आणि डेरिल मिचेलने 25 धावा केल्या तसेच. सिएटल ओर्कास कडून गोलंदाजी करताना जसदीप सिंग आणि हरमित सिंगने 2-2 विकेट्स घेतल्या.

यानंतर धावांचा पाठलाग करताना सीएटल ओर्कास संघ13.5 षटकात फक्त 60 धावांवर ऑल आऊट झाला.
सुपर किंग्स कडून गोलंदाजी करताना जिया उलहकने 3 षटकात 16 धावा देऊन 3 विकेट घेतल्या, याशिवाय नांद्रे बर्गर आणि नूर अहमदने सुद्धा तीन-तीन विकेट्स घेतल्या.

Comments are closed.