उत्तराखंडमधील अल्मोडा येथे बस दरीत कोसळली.
अल्मोरा:
उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यात एक बस दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुर्घटनेत 2 महिलांसमवेत 12 प्रवासी जखमी झाले आहेत. पोलीस आणि प्रशासनाच्या टीमने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविले आहे. अल्मोडाच्या भिकियासैंण भागात बस दरीत कोसळली. या बसमधून एकूण 19 जण प्रवास करत होते. या दुर्घटनेमागील कारणांचा शोध घेतला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Comments are closed.