रिषभ पंतसाठी सुवर्णसंधी! नंबर 1 विकेटकीपर-फलंदाज बनत गिलख्रिस्टलाही मागे टाकण्याची शक्यता
भारतीय संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले आहे. या शानदार खेळीनंतर तो चर्चेचा विषय बनला आहे. रिषभ पंत भारताचा सर्वात यशस्वी विकेटकीपर फलंदाज बनला आहे. पंतचे लक्ष आता कसोटी स्वरूपात जगातील नंबर 1 विकेटकीपर फलंदाज बनण्यावर असणार आहे. जर पंत अशा प्रकारे खेळताना दिसला तर तो अनुभवी एडम गिलख्रिस्टचा विक्रम मोडू शकतो.
विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतने वयाच्या 27 व्या वर्षी 44 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 43.41 च्या सरासरीने 3082 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 7 शतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये विकेटकीपर म्हणून सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत तो टॉप 5 मध्ये पोहोचला आहे. या यादीत एडम गिलख्रिस्ट पहिल्या क्रमांकावर आहे. ज्यांनी 17 शतके ठोकली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अँडी फ्लॉवरने आतापर्यंत 12 शतके ठोकली आहेत. याशिवाय इंग्लंडच्या लेग एम्सने 8 कसोटी शतके ठोकली आहेत. चौथ्या क्रमांकावर असलेल्या एबी डिव्हिलियर्सनेही 7 कसोटी शतके ठोकली आहेत. अशाप्रकारे, पंत पुढील 5 ते 6 वर्षांत एडम गिलख्रिस्टला मागे टाकत या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकतो
फक्त शतकांच्या बाबतीतच नाही तर रिषभ पंत धावांच्या बाबतीतही नंबर 1 वर पोहोचू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा एडम गिलख्रिस्टच्या नावावर आहे. एडमने 96 कसोटी सामन्यांमध्ये 47.61 च्या सरासरीने 5570 धावा केल्या आहेत. पंत आता गिलख्रिस्टपेक्षा सुमारे 2500 धावा मागे आहे. पंत सध्या भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा सामना जिंकणारा फलंदाज आहे. इंग्लंडविरुद्धच्या या दौऱ्यात तो टीम इंडियासाठी महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो.
Comments are closed.