सामाजिक मानसिकता बदलत आहे

>> प्रा. हनुमान व्हरगुळे
दिवसेंदिवस घडत जाणाऱ्या वेगवेगळ्या घटना आणि त्याचे समाजमनावर होत जाणारे परिणाम पाहिले तर त्यातून दिसून येणारी मानसिक स्थित्यंतरे पाहण्यासारखी आहेत. तांत्रिकदृष्टय़ा सबळ होऊ पाहणारी मानवी पिकुठल्या तरी धार्मिक अंधश्रद्धा अडकलेली दिसते. त्यातून बाहेर पडण्याची मानसिक अवस्था नाही. बुवाबाजी, भविष्य सांगणाऱया लोकांची कमालीची वाआणि त्याचे मानसिक आघात वेगानं समाजमनावर होताना दिसताहेत. किती लोक याचे शिकार होत जाताना दिसताहेत. श्रद्धा आणि भीती यांचं कमालीचं मिश्रण करून राजकीय सत्ता स्थिर होऊ पाहताहेत. माणसामाणसात भीती वेगानं पसरवली जाते आहे. यात प्रसारमाध्यमे सहभागी होताना दिसताहेत. यातून होत जाणारे सामाजिक, मानसिकतेतील बदल अनेक पातळ्यांवर स्फोटक झाल्याचे दिसते. ही स्फोटकता कमालीची वेगवान आहे. शहरापासून खेडय़ापर्यंत जात-धर्म-झेंडे यातून वादंग पेटताना दिसताहेत.
मोबाईलच्या प्रचंड वापरामुळे मुलं आणि आईवडील यांच्यात वाजाणारी दरी वेगळीच आहे. मानसिक पातळीवर एकटी पडत जाणारी असंख्य मुलंमुली व्यसनाधीन होऊन आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत अडकलेली आहेत. वेगवान तंत्रज्ञान आणि मायबापाच्या वाया अपेक्षा पाहून मानसिक पातळीवर मुलं दिसतात. पालकही याच स्थितीत दिसताहेत. शिक्षणानं स्वतंत्र विचार करण्याची मानसिक अवस्था निर्माण होण्याऐवजी गुलामी स्वीकारणारी मानसिकता चालली आहे.
रील्स बघण्यात तासन्तास घालवणारे तरुण-तरुणी. चकचकीत जगाला भुलणारे, वरवरचे मोह अन् त्या मोहाला बळी पडून आपलं जगणं अंधारात लोटणारे कितीतरी लोक पाहायला मिळतात. पुनः पुन्हा एखाद्या आकर्षक जाहिरातीच्या मोहात पडलेले लोक. हातातल्या मोबाईलवर येणाऱया माहितीत कोण आपलं ‘खातं’ हॅक करतय की काय… आपण उचललेला फोन आपलं मानसिक खच्चीकरण करून आपल्याला एखाद्या अज्ञात जाळय़ात अडकवून टाकणाऱया कितीतरी गोष्टी, ज्या आपल्या जगण्याचा भाग होऊ पाहताहेत. खोटं बोलणं सर्रास मानवी वर्तन होऊ पाहतंय. खरं बोलणाऱयाला बाजूला केलं जातं. हे आधीपासून असलं तरी सत्याची बाजू घेणारे, जाणीव असणारे लोक त्यावेळी होते.
आज ते शून्य होताना दिसतंय. दिवसेंदिवस मानसिक दिवाळखोरी वादिसतेय. सत्यता पडताळून न पाहणाऱयांची संख्या वेगाने वादिसतेय. दिसणं आणि नसणं यातलं अंतर वान दिसणारं आकर्षणाचा बिंदू ठरतंय. या आभासी जगातच पिरममाण होत आहे. भाव असण्याऐवजी भावसक्ती केली जातेय. भक्ती असण्याऐवजी अंधभक्त, अंध अनुकरण वामाणूस उभा राहण्याऐवजी जात-धर्म-पंथ-श्रेष्ठतेच्या मोहात… आपल्याजवळ असलेली भूतदया गमावताना एक प्रकारे मानसिक बदलाचे दर्शन घडवत जातो आहे. झपाटय़ानं सामाजिक, मानसिकतेत होत जाणारे बदल ही गुंतागुंतीची आणि वेगवान क्रिया आहे.
Comments are closed.