पुण्यातील बाल संरक्षण अधिकाऱ्याने, हनी सिंगच्या अश्लील गाण्यांसंदर्भात पोलीस आयुक्तांना लिहिले पत्र
हनी सिंगच्या गाण्याबाबत सध्या एक वाद उपस्थित झालेला आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याचे बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांनी गुरुवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र लिहून यो यो हनी सिंगच्या गाण्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि आरोप केला आहे की, ही गाणी दारू, अमली पदार्थ आणि बंदूक संस्कृतीचे उदात्तीकरण करतात.”
जाधव यांनी पोलीस विभागाला विनंती केली आहे की, हनी सिंगच्या कार्यक्रमांमध्ये गायली जाणारी गाणी योग्य, सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि बाल संरक्षण तत्त्वे व वैधानिक असल्याची खात्री करावी.
चंदीगडचे रहिवासी डॉ. पंडितराव धारेनावर यांनी महाराष्ट्र महिला आणि बाल विकास विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर हे पत्र लिहिण्यात आले. जाधव यांनी पत्रात म्हटले आहे की, “हनी सिंगची ‘वन बॉटल डाऊन’, ‘चार बॉटल वोडका’, ‘मनाली ट्रान्स’, ‘दिस पार्टीज गेटिंग हॉट’, ‘मखाना’, ‘गोलियां’, ‘मिलियनेअर’ यांसारखी गाणी दारू, अमली पदार्थ आणि बेकायदेशीर गोष्टींचे उदात्तीकरण करतात.”
ते म्हणाले, “हनी सिंगच्या कॉन्सर्टमध्ये अल्पवयीन मुलांना (१८ वर्षांखालील) परवानगी आहे. जर त्याने (हनी सिंगने) अशी गाणी गायली, तर त्याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.”
इंटरनेटवर अनेक वर्षे अश्लीलता पसरवल्यानंतर, हनी सिंग आणि बादशाह यांचे एक गाणे कायदेशीर अडचणीत सापडले आहे. न्यायालयाने ‘माफिया मुंडीर’ (व्हॉल्यूम १) हे गाणे डिजिटल विश्वातून पूर्णपणे हटवण्याचे आदेश दिले आहेत. हा हनी सिंग आणि बादशाह यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.
Comments are closed.