जम्मू-काश्मीरमध्ये चिनी ग्रेनेड सापडला आहे.
पाकिस्तानने सीमेवर ड्रोनने पाडविली शस्त्रास्त्रs : मोठा कट उधळण्यास यश
मंडळ संस्था/श्रीनगर
प्रजासत्ताक दिनापूर्वी भारताने पाकिस्तानचा मोठा कट उधळून लावला आहे. पाकिस्तानातून आलेल्या एका ड्रोनने जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात सीमेनजीकच्या गावात शस्त्रास्त्रs आणि दारुगोळ्याची खेप पाडविली. परंतु गुप्तचर माहिती मिळताच बीएसएफ आणि जम्मू पोलिसांच्या विशेष पथकाने ही शस्त्रास्त्रs हस्तगत करत मोठा कट हाणून पाडला आहे.
पथकाने राजपुरा भागातील पालूरा गावात शोधमोहीम राबविली असता एक पाकिट आढळून आले, ज्यात एक चिनी एचई ग्रेनेड, 9एमएम कार्टिजचे 16 राउंड, एक मॅगजीनसोबत ग्लॉक पिस्टल आणि दोन मॅगजीनसोबत एक स्टार पिस्तुल होते. प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही शस्त्रास्त्रs सापडल्याने दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावण्यास यश मिळाले आहे.
यापूर्वी सांबा येथील घगवाल तालुक्यात आंतरराष्ट्रीय सीमेनजीक एक पाकिस्तानी ड्रोन दिसून आला होता, ज्यानंतर अमली पदार्थ, शस्त्रास्त्रs किंवा इतर सामग्रीच्या एअरड्रॉपिंगच्या संशयापोटी शोध मोहीम राबविण्यात आली होती. तर त्यापूर्वी 27 ऑक्टोबर रोजी बीएसएफने जम्मू जिल्ह्याच्या रणवीर सिंह पुरामध्ये सीमेपलिकडून होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला होता. पाकिस्तानी ड्रोनद्वारे पाडविण्यात आलेल्या दोन बॅग हस्तगत करण्यात आल्या होत्या, ज्यात 5 किलोग्रॅमपेक्षा अधिक हेरॉइन होते, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक होती.
Comments are closed.