सीमावर्ती भागात बेकायदेशीर धर्मांतराचा कट.
श्रीगंगानगर:
राजस्थानच्या सीमावतीं भागातील श्रीकरणपूर येथे अवैध धर्मांतराचे मोठे प्रकरण समोर आले आहे. श्री गुरुनानक दरबार गुरुद्वारानजीक एका इमारतीत अवैध प्रार्थनास्थळ चालविले जात होते. तेथे एका जर्मन दांपत्यासह काही लोक पैसे आणि अन्य प्रलोभने देत गरीबांचे धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जात हा प्रकार रोखला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत जर्मनीचे नागरिक स्वॅन बॉज बेट जलेर आणि त्यांच्या पत्नी संदरा, कर्नाटकातील रहिवासी संतोष वर्गीसी आणि केरळचे रहिवासी मॅथ्यू, बलजिंदर सिंह खोसा तसेच राजेश कंबोज या आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत हिंदू आणि शीख संघटनांचे शेकडो सदस्य या धर्मांतराच्या विरोधात एकत्र आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.
संवेदनशील क्षेत्र
पोलिसांनुसार श्रीकरणपूर हे भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेले संवेदनशील क्षेत्र आहे. येथे विदेशी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी आहे. जर्मन दांपत्याने विनाअनुमती येथे प्रवेश करत गुप्तपणे धर्मांतर घडविण्याचा प्रकार सुरू केला होता. यामुळे धार्मिक भावना भडकण्याचा धोका होता.
Comments are closed.