A coward, a bandit, and a number one beggar without courage… Why was Rohit Pawar angry? in marathi
मुलीच्या बापाने दिलेल्या हुंड्याच्या जीवावर जगणारी जमात म्हणजे स्वतःमध्ये हिंमत नसलेले षंढ, बांडगुळ आणि एक नंबरचे भिकारी असतात, असे रोहित पवारांनी म्हटले आहे. हुंडा मागणाऱ्याला हुंडा तर नाहीच पण यापुढं कोणत्याही आई-वडिलांनी मुलगीही दिली नाही पाहिजे.
Rohit Pawar : मुंबई : सध्या पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक (23) हिने शुक्रवारी (ता. 16 मे) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला वैष्णवी नेमकी कोण आहे? याबाबतची कोणतीही माहिती समोर आली नव्हती. परंतु, घटनेनंतर काही वेळातच ही महिला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर राजकारणात खळबळ उडाली. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हुंड्यासाठी झालेल्या छळामुळे ही आत्महत्या करण्यात आली. यावरूनही सर्वांमध्ये संताप आहे. हुंडा मागण्याच्या या प्रथेवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी टीका करत संताप व्यक्त केला आहे. (a coward, a bandit, and a number one beggar without courage… Why was Rohit Pawar angry?)
वैष्णवी हगवणे हिचा सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी वारंवार छळ होत होता, ज्यामुळे तिने लग्नाच्या दोन वर्षातच आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे याने तिला घराबाहेर काढले. तेव्हा माहेरी येऊन तिने तिच्यासोबत होत असलेली छळवणूक आणि हुंड्यासाठी होत असलेली पैशांची मागणी याची माहिती तिच्या आई-वडिलांना दिली होती.
हेही वाचा – Sushma Andhare : अकार्यक्षम ठरलेल्या महिलेला… महिला आयोगाच्या ढिल्या कारभारावरून अंधारेंचा सवाल
धक्कादायक म्हणजे, राजेंद्र हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून तब्बल 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी घेतली होती. इतकेच नाही तर सनीज वर्ल्ड या पुण्यातील सर्वात महागड्या ठिकाणी लग्न करून देण्याच्या अटीवरच हा लग्नसोहळा पार पाडला होता, अशी माहिती एफआयआरच्या माध्यमातून समोर आली आहे. तर, लग्न झाल्यानंतर साधारणतः चार – पाच महिन्यांनी वैष्णवीची सासू लता हगवणे यांनी तिच्याकडे चांदीची भांडी मागितली होती. पण ती भांडी वैष्णवी आणि तिच्या माहेरच्यांनी न दिल्याने त्याचा राग मनात धरून लता वैष्णवीला सतत घालूनपाडून बोलत असत. वैष्णवीच्या मृत्यूनंतर ही सगळी माहिती समोर आल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार चांगलेच संतापले आहेत. अशाप्रकारे मुलीच्या वडिलांकडून सगळं उकळून घेऊन संसार करणाऱ्यांवर त्यांनी सडकून टीका केली आहे.
काय म्हणतात रोहित पवार?
मुलीच्या बापाने दिलेल्या हुंड्याच्या जीवावर जगणारी जमात म्हणजे स्वतःमध्ये हिंमत नसलेले षंढ, बांडगुळ आणि एक नंबरचे भिकारी असतात, असे रोहित पवारांनी म्हटले आहे. हुंडा मागणाऱ्याला हुंडा तर नाहीच पण यापुढं कोणत्याही आई-वडिलांनी मुलगीही दिली नाही पाहिजे. तसंच ‘हुंडामुक्त महाराष्ट्र’ ही राज्य सरकारने सुरू केलेली मोहीम आता थंडावल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ती पुन्हा अधिक जोमाने राबवून लोकांपर्यंत पोचवली तर भविष्यात अनेक ‘वैष्णवीं’चा जीव वाचेल, असेही ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात.
मुलीच्या बापाने दिलेल्या हुंड्याच्या जीवावर जगणारी जमात ही स्वतःमध्ये हिंमत नसलेले षंढ, बांडगुळ आणि एक नंबरचे भिकारी असतात. हुंडा मागणाऱ्याला हुंडा तर नाहीच पण यापुढं कोणत्याही आई-वडीलांनी आपली मुलगीही दिली नाही पाहिजे. तसंच ‘हुंडामुक्त महाराष्ट्र’ ही राज्य सरकारने सुरु केलेली… pic.twitter.com/Jjf5RIGOVQ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 22, 2025
Comments are closed.