पुन्हा कधीच नाही जाणार पाकिस्तानात, विमानतळावरच ढसाढसा रडला 'हा' क्रिकेटर!
भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली. यापूर्वी दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती आणि भरपूर बॉम्बस्फोट झाले होते, दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) पीएसएल 2025 पुढे ढकलण्याची घोषणा केली होती. अलिकडेच, जेव्हा विदेशी क्रिकेटपटू पाकिस्तानहून उड्डाण केल्यानंतर दुबई विमानतळावर उतरले तेव्हा बांगलादेशी खेळाडू रिशाद हुसेनने (Rishad Hossain) आपली वेदना व्यक्त केली. त्याने सांगितले की, त्याचा सहकारी क्रिकेटपटू नाहिद राणा कसा थरथर कापू लागला. त्याने एका क्रिकेटपटूबद्दल देखील सांगितले ज्याने म्हटले आहे की तो कधीही पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवणार नाही.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, दुबई विमानतळावर उतरल्यानंतर रिशाद हुसेन (Rishad Hossain) पत्रकारांशी बोलताना म्हणाला, “सॅम बिलिंग्ज, डॅरिल मिशेल, कुसल परेरा, डेव्हिड व्हेसी आणि टॉम करनसह सर्व खेळाडू घाबरले होते. दुबईत उतरल्यानंतर, डॅरिल मिचेलने मला सांगितले की तो पुन्हा कधीही पाकिस्तानला जाणार नाही, विशेषतः अशा संकटाच्या काळात नाही.”
रिशाद हुसेनने असेही सांगितले की जेव्हा टॉम करनला कळले की पाकिस्तानमधील विमानतळ बंद आहे, तेव्हा तो रडू लागला. टॉम करन लहान मुलासारखा रडू लागला आणि त्याला शांत करण्यासाठी 2-3 लोकांची गरज होती.
बांगलादेशचा खेळाडू रिशाद हुसेनने असेही सांगितले की दुबईत उतरल्यानंतर त्याला बातमी मिळाली की त्याचे विमान पाकिस्तान विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या 20 मिनिटांत विमानतळावर हल्ला झाला आहे. मृत्यूपासून अवघ्या 20 मिनिटांच्या अंतरावर असल्याने रिशाद हुसेन म्हणाला की दुबईत आल्यानंतर त्याला दुसरे जीवन मिळाल्यासारखे वाटले.
Comments are closed.