एक दशकाची तयारी, पाकिस्तानवर एक भारी ओझे
अभेद्य सुरक्षा कवचासमोर पाकिस्तानी क्षेपणास्त्र फेल
भारताकडून राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरने केवळ दहशतवाद्यांचे 9 तळ नष्ट केले आहेत, असे नाही तर आता भारत केवळ स्वत:च्या हवाई सीमांचे रक्षण करत नसून त्यावर नियंत्रणही राखत असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये भारतीय सैन्यतळांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरला आहे. ही सर्व क्षेपणास्त्रs इंटरसेप्ट करण्यात आली किंवा आकाशातच नष्ट करण्यात आली. एक देखील क्षेपणास्त्र स्वत:च्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलेले नाही. भारतीय हवाई सुरक्षा प्रणालीचे हे यश 11 वर्षांच्या रणनीतिक तयारीचा परिणाम आहे, या रणनीतिला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात नियोजनबद्ध स्वरुपात तयार करण्यात आले आहे. तसेच यात पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा प्रणालीच्या उणीवा देखील उघड झाल्या आहेत.
शत्रूची क्षेपणास्त्र नष्ट, भारताची हवाई ढाल अभेद्य
भारतीय सुरक्षा यंत्रणा आता अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी पूर्णपणे सज्ज आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये एकीकृत ड्रोन-विरोधी प्रणाली (इंटीग्रेटेड काउंटर-युएएस ग्रिड, एस-400 ट्रायम्फ, बराक-8 मिसाइल, आकाश क्षेपणास्त्र आणि डीआरडीओचे ड्रोनविरोधी तंत्रज्ञान)चा संयुक्त वापर करण्यात आला, यामुळे एक अशी एरियल शील्ड निर्माण झाली, ज्याला पाकिस्तानी शस्त्रास्त्रs भेदू शकले नाहीत.
वेगवान प्रतिकार अन् अचूक हल्ले
भारताने केवळ रक्षण केले नाही, तर वेगवान आणि अचूक हल्ल्यांनी प्रत्युत्तर देखील दिले आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने लाहोरमध्ये चीनकडून निर्मित एचक्यू-9 एअर डिफेन्स युनिटला उद्ध्वस्त केले आणि रडार सिस्टीमचे मोठे नुकसान घडविले. राफेल लढाऊ विमानांनी स्कॅल्प आणि हॅमर क्षेपणास्त्रांद्वारे पाकिस्तानच्या सैन्य क्षमतांना मोठा झटका दिला.
आत्मनिर्भर भारताच्या तंत्रज्ञानाची दमदार कामगिरी
ही सैन्य तयारी एका रात्रीत गाठता आलेली नाही. या ऑपरेशनमध्ये भारतात निर्मित ‘लोइटरिंग म्युनिशन’ (आत्मघाती ड्रोन)चा वापर झाला. 2021 मध्ये ऑर्डर आणि 2024 मध्ये तैनात झाल्यावर या ड्रोनने पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेला पूर्णपणे चकविले आहे. तसेच इस्रायली बनावटीचे ‘हारोप ड्रोन’ आता भारतात निर्मित होत असून ते कराची आणि लाहोर येथील एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट करण्यासाठी वापरण्यात आले आहेत.
एका दशकाच्या तयारीचा परिणाम
1 एस-400 ट्रायम्फ : 2018 मध्ये 35 हजार कोटी रुपयांच्या व्यवहाराच्या अंतर्गत 5 स्क्वाड्रन्स खरेदी करण्यात आल्या, यातील 3 आता चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात आहेत.
2 बराक-8 मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र : 2017 मध्ये इस्रायलसोबत 2.5 अब्ज डॉलर्सचा करार झाला. या कराराच्या अंतर्गत प्राप्त बराक 8 क्षेपणास्त्रs आता भटिंडासारख्या सीमावर्ती शहरांची सुरक्षा करत आहेत.
3 स्वदेशी आकाश क्षेपणास्त्र : डीआरडीओकडून विकसित क्षेपणास्त्रs आता सुरक्षा प्रणालीचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहेत.
Comments are closed.