Champions Trophy: जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर आज होणार अंतिम निर्णय!
आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) (19 फेब्रुवारी) पासून सुरू होणार आहे. भारतीय संघ (20 फेब्रुवारी) रोजी बांगलादेशविरूद्ध सामना खेळून या मेगा स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरूवात करेल. पण चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल (Jasprit Bumrsh) अनिश्चितता कायम आहे. बुमराहचा चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
परंतु, बुमराह स्पर्धेत खेळणार की नाही? हे अद्याप निश्चित झाले नाही. दुखापतीमुळे बुमराह इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेचाही भाग नाही. आज म्हणजेच (11 फेब्रुवारी) रोजी बुमराह खेळणार की नाही? याचा अंतिम निर्णय घेतला जाईल.
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्व संघांना (11 फेब्रुवारी) पर्यंत आपला अंतिम संघ सादर करायचा आहे. बीसीसीआय (BCCI) या अंतिम मुदतीपर्यंत बुमराहच्या फिटनेस अपडेटची वाट पाहू शकते. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, बुमराहने अलिकडेच बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याच्या कंबरचे स्कॅनिंग केले. आता बुमराहबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, वैद्यकीय कर्मचारी, व्यवस्थापन सदस्य आणि निवडकर्त्यांना भेटतील.
जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबद्दल आज (11 फेब्रुवारी) काय निर्णय येतो हे पाहणे महत्वाचे ठरेल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बुमराह भारतासाठी सर्वात महत्त्वाचा वेगवान गोलंदाज असेल. या स्पर्धेसाठी भारतीय संघात समाविष्ट असलेले उर्वरित गोलंदाज इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत आतापर्यंत विशेष धारदार गोलंदाजी करू शकले नाहीत.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा
महत्त्वाच्या बातम्या-
फॅब-4 आणि शतक: विराट, स्मिथ, रूट यांच्या प्रतीक्षेची कहाणी
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी जसप्रीत बुमराहच्या सहभागावर अनिश्चितता, अंतिम निर्णय लवकरच
केन विल्यमसनने 7,000 धावांचा ओलांडला टप्पा! भारताच्या दिग्गजाला टाकले मागे
Comments are closed.