अंटार्क्टिका अंतर्गत एक वेगळे जग लपलेले आहे

खाली 44 किलोमीटर खोल दऱ्या अन् पर्वत

अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली एक वेगळेच जग दडले आहे. येथे अनेक किलोमीटर उंच पर्वत आणि खोल दऱ्या आहेत. जर हे पृष्ठभागावर आले असते तर याच्या मनमोहक खोऱ्यांनी लोकांना स्वत:कडे आकर्षित केले असते. अंटार्क्टिकामध्ये संशोधकांनी बर्फाखाली समुद्रात सुमारे 300 जलखोऱ्यांचा शोध लावला आहे. यातील काही 4 हजार मीटरपर्यंत खोल आहेत.

4000 मीटरपेक्षाही उंच पर्वत

नव्या उच्च-रिझोल्युशन बॅथिमेट्रिक डाटाच्या मदतीने आयर्लंडमध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज कॉर्क आणि स्पेनमध्ये बार्सिलोना विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी दडलेल्या खोऱ्यांचा शोध लावला आहे. त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष मरीन जियोलॉजी नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. युबीच्या पृथ्वीविज्ञान शाखेत सागरी भूविज्ञानावर संशोधन करणाऱ्या समुहाचे डेव्हिड एम्बलास यांनी आम्ही ज्या अंडरवॉटर खोऱ्यांचे विश्लेषण केले, त्यातील काहींची खोली 4000 मीटरपेक्षा अधिक असल्याचे सांगितले. यातील सर्वात आकर्षक जलखोर पूर्व अंटार्क्टिकात असून ते जटिल शाखा असलेले आहे. ही साखळी बहुधा महाद्विपक्षीय शेल्फच्या किनाऱ्यावर अनेक खोऱ्यांच्या शिखरापासून सुरू होते आणि एका मुख्य चॅनेलमध्ये परिवर्तित होते, जे महाद्विपक्षीय आवरणांना पार करत खोल समुद्रात उतरतात. युनिव्हर्सिटी कॉलेज कॉर्कच्या सागरी भूविज्ञान संशोधन समुहाचे सदस्य रिकार्डो एरोसियो यांनी मागील नकाशांच्या 1-2 किलोमीटर प्रति पिक्सेलच्या तुलनेत 500 मीटर प्रति पिक्सेलमुळे आम्ही या बुडालेल्या खोऱ्यांची ओळख पटवू शकलो आणि आता विश्लेषणासाठी अर्ध-स्वयंचलित तंत्रज्ञानाची मदत घेणार असल्याची माहिती दिली.

कशी दिसतात जलखोरे

अंटार्क्टिकावर त्याच्या स्थानाच्या आधारावर सर्व खोरे एकसारखी नाहीत. पूवेंत खोरे अधिक जटिल आणि अनेक शाखा असलेल्या आहेत. अनेकदा विशिष्ट यू-आकाराच्या क्रॉस सेक्शनसोबत अनेक खोऱ्यांची एक विस्तृत साखळीच्या सवरुपात फैलावलेली आहे. तर पश्चिमेत पर्वत छोटे आणि अधिक उंच आहेत. पूर्व अंटार्क्टिकात बर्फाचे आवरण पश्चिम अंटार्क्टिकाच्या बर्फाच्या आवरणापेक्षा जुने असल्याचे संशोधकांचे मानणे आहे, कारण याचा विकास अधिक दीर्घकाळापर्यंत चालतो.

अंटार्क्टिका एक थंड टिकाण आहे आणि पृष्ठभागारव बर्फ स्पष्ट दिसून येतो. तर खाली पर्वत असून तेथे अनेक खोरे आणि पर्वत शिखर आढळून येतात. पाण्याखाली खोऱ्यांचे अशाप्रकारे असणे महत्त्वपूर्ण आहे, कारण ते सागरी जीवनात विविधता आणतात.

10 हजारांपेक्षा अधिक संख्या

वर्तमानात वैज्ञानिकांनी जगभरात 10 हजारांहून अधिक समुद्रात बुडालेल्या खोऱ्यांची ओळख पटविली आहे. परंतु ही संख्या याहून अधिक असल्याचे मानले जात आहे. कारण पृथ्वीच्यासमुद्र तळाच्या केवळ 27 टक्के हिस्स्याचेच उच्च गुणवत्तायुक्त मानचित्रण करण्यात आले आहे. याचमुळे तज्ञांच्या अन्वेषणासाठी आणखी अधिक अंडरवॉटर खोरे असण्याची शक्यता आहे.

Comments are closed.