मराठी संतावर पहिला पाश्चात्त्य चित्रपट; संत सावता माळी यांच्या जीवनावरील चित्रपट येणार भेटीला

युरोपमधील चित्रपट स्टुडिओने संत सावता माळी यांच्यावरील पहिला पाश्चात्त्य चित्रपट महाराष्ट्रात चित्रीत केला. हा महाराष्ट्रातील संत परंपरेवरील अनेक नियोजित चित्रपटांपैकी पहिला चित्रपट आहे. वर्षाअखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आत्मारामा स्टुडिओ निर्मित हा प्रकल्प गोविंददास (इगोर मिहाज्लोविक, क्रोएशिया) आणि अचला (सिल्विया मिहाज्लोविक, पोलंड) या जोडप्याने त्यांच्या सद्गुरू परमहंस विश्वानंद यांच्या प्रेरणेने मराठी संतांच्या कथा साकारण्यासाठी केला आहे.
विठ्ठलाची आस, हा चित्रपट पहिल्यांदाच चित्रपटात काम करणाऱ्या स्थानिक कलाकारांसोबत शूट करण्यात आला आहे. या चित्रपटात संत सावता माळी यांच्या वंशजांनी काम केले आहे. हा चित्रपट सावता माळी यांनी काम केलेल्या शेतामध्ये चित्रीत करण्यात आला आहे. यात अरण, रोपळे, बोराळे या गावातील नवोदित कलाकारांनी अभिनय केला आहे, तर संत सावता माळी यांच्या 17 व्या व 18 व्या पिढीतील वंशज देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची वारकरी, भाविकांना उत्सुकता लागली आहे.
Comments are closed.