“पाकिस्तानविरूद्ध विराट कोहलीने 150 शतक ठोकले असते” चाहत्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

2025च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (ICC Champions Trophy 2025) पाकिस्तानविरुद्ध भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट जोरदार चालली. कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले आणि भारताला शानदार विजय मिळवून दिला. कोहलीचे हे आपल्या वनडे कारकिर्दीतील 51वे शतक आहे. कोहलीच्या या खेळीचे खूप कौतुक होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कोहलीबद्दल एक मोठा दावा करण्यात आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चाहत्याने म्हटले आहे की, जर भारत आणि पाकिस्तानमधील सामना नियमित असता तर विराट कोहलीने त्याचे 150 शतक झळकावले असते याची मी हमी देतो. एक माणूस जो शतके करत नव्हता, त्याने पाकिस्तानविरूद्ध शतक केले.

तो पुढे म्हणाला की, जो खेळाडू अजिबात फॉर्ममध्ये नव्हता, त्याला कळले की तो पाकिस्तान आहे आणि त्याला हे देखील माहित होते की पाकिस्तानविरुद्ध शतक निश्चित आहे.

व्हिडिओमध्ये असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने म्हटले की, सुदैवाने भारताने पाकिस्तानचा दौरा केला नाही, अन्यथा कोहलीने लाहोरमध्ये असे काही केले असते जे त्याच्या येणाऱ्या पिढ्यांना लक्षात राहील.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल 2025 पूर्वी मोठी घोषणा; दिल्ली कॅपिटल्समध्ये ‘या’ खेळाडूची एन्ट्री
IPL 2025: KKRच्या कर्णधारपदासाठी स्टार खेळाडू सज्ज! म्हणाला…
सामना रद्द, आता दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी कसा ठरेल पात्र ?

Comments are closed.