“मी श्रेयस अय्यरच्या मुलाची आई…” बिग बॉसच्या 'या' माजी स्पर्धकेचा खळबळजनक दावा!

श्रेयस अय्यर: भारतीय संघातील स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची गणना जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये होते. त्याच्या खेळण्याची शैली खूप खास आहे आणि त्याने आपल्या कर्णधारपदानेही चाहत्यांना वेड लावले आहे. त्याच्या चाहत्यांच्या यादीत बिग-बॉस 18 (Bigg Boss 18) च्या एका स्पर्धकाचे नावही सामील झाले आहे, जिने अय्यरबद्दल खूप मोठा दावा केला आहे. या स्पर्धकेवर प्रेमाचं असं वेड चढलं आहे की तिने मनातल्या मनात अय्यरला आपला पती मानले आहे आणि ती म्हणते की ती अय्यरच्या मुलाची आई आहे. (Adin Rose Big Boss)

या महिलेचे नाव एडिन रोज आहे, जिने ‘फिल्मी ज्ञान’ला दिलेल्या एका ताज्या मुलाखतीत श्रेयस अय्यरबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले आहे. (Adin Rose Interview) ती म्हणाली, “माझा विश्वास आहे की मी श्रेयस अय्यरच्या मुलाची आई आहे. मी मनातल्या मनात अय्यरशी लग्न केले आहे. तो मला दररोज प्रेरणा देतो. त्याची नम्रता, त्याचे लक्ष आणि त्याचे वर्तन मला सर्वात जास्त आवडते.” (Adin Rose Shreyas Iyer Claim)

एडिन रोज भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे, जिचा जन्म दुबईत झाला होता. ती 2020 मध्ये भारतात येऊन स्थायिक झाली होती. तिने आपल्या आदर्श जोडीदाराच्या गुणांबद्दल सांगताना म्हटले की तिला तिच्या आदर्श व्यक्तीमध्ये 4 गोष्टी हव्यात. चांगली उंची, त्वचेचा रंग गडद असावा, चेहऱ्यावर दाढी आणि चांगली स्नायू (मसल्स) असाव्यात, एडिन रोजला तिच्या परफेक्ट जोडीदारामध्ये या गोष्टी हव्यात. रोजने याआधी विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्माला (Anushka Sharma) एक परफेक्ट कपल म्हटले होते. (Virat Kohli Anushka Sharma Perfect Couple)

श्रेयस अय्यरबद्दल बोलायचे झाल्यास, त्याला शेवटचे मुंबई टी20 लीगमध्ये (Mumbai T20 League) खेळताना पाहिले गेले होते, जिथे फायनल सामन्यात त्याच्या संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्याआधी आयपीएल 2025 (IPL 2025) मध्येही त्याच्या संघाला, म्हणजेच पंजाब किंग्सला (Punjab Kings) आरसीबीविरुद्ध (RCB) 6 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. (IPL 2025 Punjab Kings)

Comments are closed.