भारत-इंग्लंड मालिकेआधी टेस्ट रँकिंगची झलक! पाहा टॉप फलंदाज आणि गोलंदाज कोण
भारत आणि इंग्लंड (India-England) दोन्ही संघांमध्ये अनेक मोठे खेळाडू आहेत. एकीकडे इंग्लंड संघात जो रूट आणि हॅरी ब्रूकसारखे मजबूत फलंदाज आहेत, तर दुसरीकडे भारतीय संघात जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवसारखे गोलंदाज आहेत. शुभमन गिलच्या रूपात भारतीय कसोटी संघाला एक नवीन कर्णधार मिळाला आहे. भारत-इंग्लंड मालिका सुरू होण्यापूर्वी, आयसीसी कसोटी क्रमवारीत टॉप 10 मध्ये कोणते खेळाडू समाविष्ट आहेत ते जाणून घेऊया.
आयसीसीच्या फलंदाजी क्रमवारीत भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांमधील 2-2 खेळाडूंचा समावेश आहे. परंतु या यादीत इंग्लंडने विजय मिळवला आहे, कारण या यादीतील टॉप 2 फलंदाज इंग्लंडचे आहेत. आयसीसीच्या पुरुष फलंदाजी क्रमवारीत जो रूट पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, हॅरी ब्रुक या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, यशस्वी जयस्वाल आयसीसीच्या फलंदाजी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतचाही या यादीत समावेश आहे आणि तो 10 व्या क्रमांकावर आहे.
आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारी, भारताकडे या फॉरमॅट मध्ये सर्वोत्तम गोलंदाज आहेत. जसप्रीम बुमराह या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. यासोबतच रवींद्र जडेजा देखील आयसीसी क्रमवारीत 10 व्या क्रमांकावर आहे. आयसीसी क्रमवारीत पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये इंग्लंडचा एकही खेळाडू नाही हे इंग्लंडच्या गोलंदाजीसाठीची वाईट बाब आहे.
आयसीसी कसोटी क्रमवारीनुसार, इंग्लंडची फलंदाजीची ताकद दिसून येते त्याच वेळी भारताच्या गोलंदाजांची ताकद देखील दिसून येते. आयसीसी क्रमवारीत अशा अनेक खेळाडूंचा समावेश नाहीये, जे या मालिकेत चांगली कामगिरी करू शकतात. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स हा एक उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच वेळी, शुभमन गिल देखील या मालिकेत कर्णधारपदाची खेळी खेळताना दिसू शकतो.
Comments are closed.