LSG vs SRH: सामन्यादरम्यान अभिषेक- दिग्वेशमध्ये मोठी वादावादी! पाहा व्हिडिओ
आयपीएल 2025 स्पर्धेतील 61 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स दोन्ही संघात खेळला गेला. या सामन्यादरम्यान सामन्यात दोन भारतीय खेळाडू एकमेकांविरूद्ध वाद घालताना दिसले. या रोमांचक सामन्यात हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा शानदार फटकेबाजी करताना दिसला. अभिषेक शर्माने लखनऊ दिलेल्या 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फक्त 18 चेंडूत अर्धशतक झळकावले. पण यादरम्यान त्याने दिग्वेश राठीबरोबर त्याचा वाद झाला.
हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा झेलबाद झाल्यानंतर दिग्वेश राठीवर चांगलाच संतापलेला दिसला. लखनऊचा फिरकीपटू दिग्वेश राठीने अभिषेकला बाद केलं आणि संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली, तेव्हा ही घटना घडली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंचांना आणि इतर खेळाडूंनाही मध्यस्थी करावी लागली. पण दोन्ही खेळाडू एकमेकांच्या जवळ जात जोरदार वाद घालताना दिसले.
सनरायझर्स हैदराबादच्या डावाच्या 8 व्या षटकात, अभिषेक शर्मा 19 चेंडूत 56 धावा करत वादळी खेळी करत मैदानात कायम होता. पण यानंतर दिग्वेश राठीच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्मा मोठा फटका खेळायला गेला आणि सीमारेषेजवळ शार्दुल ठाकूरने त्याला झेलबाद केलं. यानंतर दिग्वेश आणि अभिषेकमध्ये वादावादी सुरू झाली. अभिषेकने दिग्वेशला जवळ बोलावत त्याच्याशी बोलला, तर दिग्वेश त्याला जाऊन म्हणाला, मी तुम्हाला काहीच म्हणालो नाही. पण यानंतर दिग्वेशही वैतागलेला दिसला. तर अभिषेक चांगलाच संतापलेला होता.
दिग्वेशला विकेट मिळाल्यानंतर याशिवाय तो विकेटचा आनंद साजरा प्रसिद्ध ‘नोटबुक सेलिब्रेशन’ने साजरा केला, ज्यामध्ये तो काल्पनिक नोटबुकमध्ये काहीतरी लिहिल्यासारखे हावभाव करतो. त्याचं हे सेलिब्रेशन अनेकदा वादग्रस्त ठरलं आहे.
मोठी बाब म्हणजे शार्दुलने अभिषेकला झेलबाद करताच दिग्वेश राठीने त्याला हातवारे करत मैदानाबाहेर जाण्याचा इशाराही केला. त्यानंतर अभिषेक शर्माला राग आला आणि दोन्ही खेळाडू रागाच्या भरात एकमेकांच्या जवळ येऊन वाद घालू लागले. हे पाहून पंचांना हस्तक्षेप करावा लागला. अभिषेक शर्मा यादरम्यान प्रचंड वैतागलेला दिसला. तर दिग्वेश राठीदेखील त्याला प्रत्युत्तर देताना दिसला.
Comments are closed.