वैभव सूर्यवंशीने शतक झळकावत रचला इतिहास, इंग्लिश गोलंदाजांची झोप उडवली

भारतीय संघात नवीन उदयास आलेला तारा वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) आयपीएल 2025 (IPL 2025) नंतर मागे वळून पाहिलेच नाही. आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून (RR) जबरदस्त कामगिरी केल्यानंतर आता सूर्यवंशीने इंग्लंडमध्ये अंडर-19 टीम इंडियासाठी धुमाकूळ घातला आहे.

मालिकेच्या चौथ्या वनडे सामन्यात वैभव सूर्यवंशीने तुफान शतक ठोकून इतिहास रचला आहे. या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांची त्यांनी जोरदार धुलाई केली.

इंग्लंड अंडर-19 संघाविरुद्ध पहिल्या युथ वनडे सामन्यात वैभव सूर्यवंशीने केवळ 19 चेंडूत 48 धावा केल्या होत्या. वनडेलाही टी-20 सारखे बनवणाऱ्या सूर्यवंशीने दुसऱ्या युथ वनडे सामन्यात 34 चेंडूत 45 धावा केल्या. दोन्ही सामन्यात अर्धशतक हुकल्यानंतर वैभवने तिसऱ्या युथ वनडे सामन्यात फक्त 31 चेंडूत 86 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. मात्र त्याला शतक हुकल्याची खंत होती. ती त्याने चौथ्या युथ वनडे सामन्यात दूर केली. या सामन्यात त्याने फक्त 52 चेंडूत शतक झळकावले. अंडर-19 क्रिकेटमध्ये हे कोणत्याही फलंदाजाचे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. वैभव सूर्यवंशीच्या शानदार खेळीपुढे इंग्लंडचे गोलंदाज अपयशी ठरले.

Comments are closed.