उत्तर प्रदेशात एका खाणीत भूस्खलन झाले.

अनेक कामगार अडकल्याची शक्यता, बचाव सुरु

वृत्तसंस्था / लखनौ

उत्तर प्रदेश राज्याच्या सोनभद्र जिल्ह्यात एका दगडाच्या खाणीवर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. ही खाण डोंगराळ भागात आहे. दगड काढत असताना उंचवट्याचा एक भाग कोसळल्याने खाणीत अनेक कामगार अडकले आहेत. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपदा निवारण दलाच्या तुकड्या पोहचल्या आहेत. राज्य सरकारच्या आपत्तीनिवारण दलानेही आपल्या तुकड्या घटनास्थळी पाठविल्या आहेत. खाणीत किमान 20 कामगार आणि काही मशिन ऑपरेटर्स अडकल्याची अनधिकृत माहिती देण्यात आली आहे.

दरड कोसळल्याने काही मोठे दगड खाणीत पडल्याने बचाव कार्य जटील झाले आहे. तरीही आपत्ती निवारण दलाचे कर्मचारी हे दगड बाहेर काढून कामगारांची सुटका करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोनभद्र जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी असून ते आपत्तीनिवारण कार्यावर लक्ष ठेवत आहेत. आवश्यकता भासल्यास खाणीच्या बाजूला भुयार खोदून कामगारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. नेमके किती कामगार अडकले आहेत, या संबंधी माहिती उपलब्ध नाही. पण ही संख्या मोठी असावी असे अनुमान आहे. खाणीत

Comments are closed.