IPL 2026 पूर्वी RCBमध्ये मोठा बदल होणार, कांतारा चित्रपटाशी नेमका काय संबंध? जाणून घ्या सविस्तर
आयपीएलच्या 19व्या हंगामासाठी होणाऱ्या मिनी ऑक्शनपूर्वी गतविजेती चॅम्पियन टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू बद्दलची मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार ‘कांतारा’ चित्रपटाचे निर्माते RCB खरेदी करण्यामध्ये रस दाखवत आहेत. होम्बळे फिल्म्सने ‘कांतारा’सोबत ‘KGF’ आणि ‘Salaar’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली आहे. RCBमधील हिस्सेदारी खरेदी करण्याबाबत सध्या होम्बळे फिल्म्स आणि Diageo India यांच्यात चर्चा सुरू आहे. सध्या RCBचे मालकी हक्क Diageo India कडे आहेत.
रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, ही डील आयपीएल 2026 पूर्वीच अंतिम होऊ शकते. ही बातमी अशा वेळी आली आहे, जेव्हा आरसीबी खरेदी करण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्या आणि व्यवसायिकांनीही रस दाखविल्याचे समजते. मात्र कोणत्या कंपन्यांनी Diageo India सोबत नेमकी चर्चा केली आहे, याबद्दल अजून स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
रिपोर्टनुसार, दोघांनी आधीही एकत्रितरीत्या काम केलेले आहे. होम्बळे फिल्म्स 2023 पासून आरसीबीचा ऑफिशियल डिजिटल पार्टनर आहे. त्यांनी टीमसाठी अनेक एंगेजमेंट कॅम्पेन, क्रिएटिव्ह प्रमोज आणि सिनेमॅटिक मॅच टीझर्स तयार केले आहेत. आता रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, होम्बळे फिल्म्सला RCBमधील हिस्सेदारी खरेदी करायची आहे.
तसेच, गौतम अदानी, देवयानी इंटरनॅशनल, Zerodha चे सहसंस्थापक निखिल कामत, JSW Group, Serum Institute चे मालक अदार पूनावाला यांनीही आरसीबीमधील हिस्सेदारी खरेदी करण्यामध्ये रस दाखविल्याचे म्हटले जाते. मात्र आरसीबीकडे अधिकृतरीत्या प्रपोजल कोणाकडून गेले आहे याची माहिती स्पष्ट नाही.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आयपीएल 2026 मध्ये डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून उतरतील. त्यांनी गेल्या सिझनमध्ये 18 वर्षांनंतर पहिला आयपीएल किताब जिंकला होता. चॅम्पियन झाल्यानंतर Diageo India ने टीमची किंमत सुमारे 17,000 कोटी रुपये असल्याचे सांगत, टीममधील हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली होती.
Comments are closed.