A major reshuffle in the maharashtra administration 23 ias officers transferred


मुंबई : राज्यातील 23 सनदी अधिकाऱ्यांच्या एकदम बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नंदिनी मिलिंद आवाडे यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती झाली असून विधान परिषदच्या उपसभापतींचे खासगी सचिव रवींद्र खेबुडकर यांची मंत्रालयातील अल्पसंख्याक विकास विभागाच्या मुंबई सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (a major reshuffle in the maharashtra administration 23 ias officers transferred)

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचीच चर्चा सुरू असताना एकदम 23 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. या बदल्यांमध्ये काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

– Advertisement –

1. संजय पवार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर म्हणून नियुक्ती

2. नंदू बेडसे यांची आयुक्त, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती

– Advertisement –

3. सुनील महिंद्राकर यांची व्यवस्थापकीय संचालक, एम.एस. या पदावर बदली

4. रवींद्र खेबुडकर यांची अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर सहसचिव म्हणून नियुक्ती

5. लक्ष्मण राऊत यांची बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबईच्या सचिवपदी नियुक्ती

6. बाबासाहेब बेलदार (SCS बढती) यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणून नियुक्ती

8. जगदीश मिनियार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्ती

9. माधवी सरदेशमुख यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, कल्याण – डोंबिवली म्हणून नियुक्ती

10. डॉ. ज्योत्स्ना पडियार यांची आयुक्त, अर्थशास्त्र आणि सांख्यिकी, मुंबई म्हणून नियुक्ती

11. अण्णासाहेब चव्हाण यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी म्हणून नियुक्ती

12. गोपीचंद कदम (SCS पदोन्नती) यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती

13. बापू पवार यांची सहसचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती

14. महेश आव्हाड यांची हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती

15. वैदेही रानडे (SCS पदोन्नती), यांची सहव्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई म्हणून नियुक्ती

16. विवेक गायकवाड (SCS पदोन्नती), यांची नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर सहसचिव म्हणून नियुक्ती

17. नंदिनी आवाडे (SCS पदोन्नती), यांची सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई म्हणून नियुक्ती

18. वर्षा लड्डा (एससीएस पदोन्नती), यांची MAVIM, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती

19. मंगेश जोशी (SCS पदोन्नती) यांची उपमहासंचालक, YASDA, पुणे म्हणून नियुक्ती

20. अनिता मेश्राम (SCS पदोन्नती) यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती

21. गीतांजली बाविस्कर (SCS पदोन्नती) यांची राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई म्हणून नियुक्ती

22. दिलीप जगदाळे (SCS पदोन्नती) यांची महाडिस्कॉम, कल्याण सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती

23. अर्जुन चिखले (SCS पदोन्नती) यांची सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर म्हणून नियुक्ती


Edited by : Ashwini A. Bhatavdekar



Source link

Comments are closed.