ICC रँकिंगमध्ये मोठा बदल, या स्टार खेळाडूला झटका! शुबमन-विराटसह रोहितचा दबदबा कायम
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेदरम्यान बुधवारी (22 ऑक्टोबर) ICC ने नवी रँकिंग जाहीर केली आहे. नव्या वनडे फलंदाजी रँकिंगमध्ये भारतीय स्टार श्रेयस अय्यरला (Shreyas iyer) घसरणीचा फटका बसला आहे, तर शुबमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपली जागा कायम ठेवली आहे. दरम्यान, वनडे गोलंदाजी रँकिंगमध्ये कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनाही नुकसान झालं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यरची कामगिरी प्रभावी ठरली नाही. त्याने केवळ 11 धावा केल्या. त्यामुळे त्याच्या ICC वनडे फलंदाजी रँकिंगमध्ये घसरण झाली असून तो 691 गुणांसह नवव्या स्थानावरून दहाव्या स्थानावर आला आहे.
शुबमन गिल (Shubman gill) 768 गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे, तर रोहित शर्मा (Rohit Sharma) 745 गुणांसह दुसऱ्या आणि विराट कोहली (Virat Kohli) 724 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, केएल राहुलला (KL Rahul) एका स्थानाचा फायदा झाला असून तो 640 गुणांसह 15व्या स्थानावरून 14व्या स्थानी पोहोचला आहे.
वनडे गोलंदाजी रँकिंगमध्ये कुलदीप यादवला (Kuldeep yadav) एका स्थानाचं नुकसान झालं असून तो सातव्या क्रमांकावरून सहाव्या स्थानावर आला आहे. तसेच रवींद्र जडेजाही (Ravindra Jadeja) एका स्थानाने घसरला असून तो 12व्या क्रमांकावरून 11व्या स्थानावर पोहोचला आहे.
Comments are closed.