आज वांद्रे येथे मनसेचा मेळावा; राज ठाकरे मार्गदर्शन करणार

मुंबईत उद्या 29 डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे पालिका निवडणुकीच्या रणनितीबाबत पदाधिकाऱयांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना आणि ‘मनसे’ युती झाल्यानंतर ‘मनसे’चा हा पहिलाच मेळावा असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना-मनसे युती जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. महापालिका क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांची एकजूट दिसून येत आहे. आगामी काळात दोन्ही पक्षांच्या संयुक्त सभादेखील होणार आहेत. त्याआधी वांद्रे पूर्व येथील रंगशारदा सभागृहात मनसेच्या वतीने मेळावा होत असल्याने हा मेळावा ‘मनसे’ पदाधिकाऱयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सकाळी 9.30 वाजता हा मेळावा होईल. मेळाव्याला मुंबईतील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Comments are closed.