बिहारमध्ये 'मॉब लिंचिंग'ची घटना.

नवादा येथे जमावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू : पत्नीकडून धक्कादायक खुलासे

मंडळ/नवाडा

बिहारमधील नवादा जिह्यातील रोह पोलीस स्टेशन परिसरात जमावाने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या मोहम्मद अतहर हुसेन याचा शुक्रवारी रात्री उशिरा रुग्णालयात मृत्यू झाला. मॉब लिंचिंगच्या या घटनेनंतर आता मृत अतहर हुसेनची पत्नी शबनम परवीन ही न्यायासाठी याचना करत आहे. माझ्या पतीची हत्या केवळ वेगळ्या धर्माचा असल्याने करण्यात आली. त्याची पँट उघडून त्याचा धर्म तपासण्यात आला, त्याचे हात तोडण्यात आले, त्याचे कान कापण्यात आले, त्याला विजेचा देत निर्घृण मारहाण करण्यात आली. आम्हाला प्रशासनाकडून किंवा न्यायाकडून पाठिंबा मिळालेला नाही; आम्हाला न्याय हवा आहे, असे आर्जव तिने केले आहे.

आपला पती अतहर हुसेनवर चोरीचा खोटा आरोप करण्यात आल्याचे शबनम यांनी म्हटले आहे. आपल्या पतीला जाणूनबुजून गुन्हेगार म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आपल्या पतीचे नाव आणि धर्म विचारून त्याला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा तिने केला आहे. या घटनेनंतर प्रशासनाकडून कोणतेही ठोस सहकार्य मिळत नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली.

Comments are closed.