NZ vs WI: तिसऱ्या कसोटीत जागतिक विक्रम! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली 'ही' गोष्ट

माऊंट मोंगानुई येथे सुरू असलेला न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा कसोटी सामना अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला आहे.

न्यूझीलंडने आपला पहिला डाव 575 धावांवर घोषित केला. सलामीवीर डेवॉन कॉनवे (Devon Convey) आणि टॉम लॅथम (Tom latham) यांनी पहिल्या विकेटसाठी 323 धावांची ऐतिहासिक भागीदारी केली.

लॅथमने शानदार शतक (137) झळकावले, तर कॉनवेने द्विशतक (227 धावा, 31 चौकार) ठोकले.
डावाच्या शेवटी रचिन रवींद्रनेही नाबाद 72 धावांची अर्धशतकी खेळी केली.

न्यूझीलंडच्या कसोटी इतिहासातील दुसरी सर्वात मोठी आणि गेल्या 54 वर्षांतील सर्वात मोठी सलामीची भागीदारी ठरली आहे. ही जोडी आता न्यूझीलंडची कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी जोडी बनली आहे.

न्यूझीलंडच्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनीही आक्रमक सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने एकही विकेट न गमावता 110 धावा केल्या आहेत.
जॉन कॅम्पबेल (45 धावा) आणि ब्रँडन किंग (55 धावा) सध्या मैदानावर खेळत आहेत.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच असा चमत्कार घडला आहे, जिथे सामन्याच्या पहिल्या दोन्ही डावांत सलामीच्या जोडीने (Openers) शतकीय भागीदारी केली. क्रिकेट विश्वातील हा एक नवीन जागतिक विक्रम (World Record) आहे.

Comments are closed.