पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये एक पाकिस्तानी ड्रोन दिसला.
धुक्याच्या आड घुसखोरीचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ गुरदासपूर
पंजाबच्या गुरदासपूरमध्ये कलानौर येथे सीमेला लागून असलेल्या भागांमध्ये दोन ठिकाणी ड्रोनच्या हालचाली दिसून आल्या आहेत. या घटनेनंतर बीएसएफ आणि पोलीस सतर्क झाले आहेत. बीएसएफ सेक्टर गुरदासपूरच्या अधीन येणाऱ्या चंदू वडाला सीमा चौकी आणि आबाद सीमा चौकीवर गुरुवारी रात्री उशिरा दाट धुक्यादरम्यान पाकिस्तानच्या हद्दीतून भारतीय क्षेत्रात दोन ड्रोन घुसले होते. याची माहिती मिळताच कलानौर आणि डेरा बाबा नानक पोलीस स्थानकाच्या अधीन येणारे सीमावर्ती गाव चंदू वडाला आणि आबाद क्षेत्रात शोधमोहीम हाती घेण्यात आली. बीएसफ आणि पंजाब पोलीस पाकिस्तानच्या प्रत्येक आगळीकीवर नजर ठेवून आहेत. मागील काही दिवसांपासून पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती क्षेत्रांमध्ये पाकिस्तानी ड्रोन्स दाखल होण्याच्या घटना वाढल्या आहेत. पाकिस्तान स्वत:च्या हँडलर्सपर्यंत शस्त्रास्त्रs अन् अमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी ड्रोन्सचा वापर करत आहे.
Comments are closed.