माजी निवडकर्त्याने टीम इंडियाच्या या खेळाडूला ‘चमचा’ म्हटले, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर केले गंभीर प्रश्न उपस्थित!
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली, पण यात काही आश्चर्यचकित करणारे निर्णयही समोर येताना दिसले. यामध्ये काहीच कमी खेळाडूंना टी20 आणि वनडे दोन्ही संघात जागा मिळाली. त्यात एक नाव आहे वेगवान गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) . राणा दोन्ही संघात दिसल्यावर भारतीय संघाचे माजी निवडकर्ते कृष्णमाचारी श्रीकांत (Krushnmachari Shrikant) खुश दिसत नाहीत. त्यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर (Gautam Gambhir) मोठा आरोप केला आहे आणि अजित आगरकरच्या (Ajit Agarkar) निवडीवरही प्रश्न उपस्थित केले आहे.
भारतीय संघात काही खेळाडूंची जागा निश्चित नाही, त्यांना एका मालिकेत संधी मिळते, तर दुसऱ्या मालिकेत संघातून बाहेर ठेवले जाते. यशस्वी जयस्वालच उदाहरण देत श्रीकांत म्हणाले, असा सतत बदल खेळाडूंना गोंधळात टाकतो. आपल्यालाही समजत नाही की कोणत्या खेळाडूला कधी संधी मिळेल. अचानक यशस्वी जयस्वालला संघात घेतले जाते आणि लगेच नंतर बाहेर बसवले जाते. अशा सतत बदलांमुळे खेळाडूंचा आत्मविश्वास कमी होतो.
तर युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला सतत प्रत्येक फॉरमॅटमध्ये संधी मिळत आहे. त्यावर श्रीकांत म्हणाले, संघात फक्त एकच कायमस्वरूपी खेळाडू आहे, तो हर्षित राणा. कोणालाही माहित नाही की, तो संघात का आहे. जे चांगले काम करत आहेत त्यांना निवडत नाहीत, पण जे काही करत नाहीत त्यांना घेतात. तुम्हाला 2027 वर्ल्ड कपची तयारी आधीपासून करायला हवी, पण मला वाटते तुम्ही तसे करत नाही. हर्षित राणासारखे व्हायला हवे, जे संघात निवड होण्यासाठी प्रत्येक बाबतीत होकार देतात. जर तुम्ही हर्षित राणा आणि नीतीश कुमार रेड्डीला (Nitish Kumar Reddy) संभाव्य खेळाडूंच्या यादीत घेतले, तर वर्ल्ड कपची ट्रॉफी विसरून जा.
Comments are closed.