तीन दहशतवाद्यांवर ३० लाख (३० लाख) रुपयांचे बक्षीस

पोस्टर्स जारी : दोन पोलिसांच्या हत्येचा आरोप

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथे दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या (एसपीओ) हत्येमध्ये सामील असलेल्या दहशतवाद्यांचा शोध तीव्र झाला आहे. जिल्हा पोलिसांनी तीन सक्रिय दहशतवाद्यांच्या छायाचित्रांसह पोस्टर्स जारी केले असून, त्यांच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यास 30 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख अत्यंत गोपनीय ठेवली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. पोलिसांच्या पोस्टर्सवर मोहम्मद अमीन उर्फ जहांगीर, रियाझ अहमद उर्फ हजारी आणि मुदस्सिर हुसेन यांची नावे आणि छायाचित्रे आहेत. संशयित दहशतवाद्यांविषयी माहिती गोळा करण्यासाठी हे पोस्टर्स तपासणी नाक्यांवर लावण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये लोकांना या दहशतवाद्यांच्या किंवा त्यांच्या ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.