वयाच्या 24 व्या वर्षी एक 'बचत' लक्षाधीश …

अनेक गर्भश्रीमंत लोक त्यांच्या भाग्यामुळे काहीही कष्ट न करता कोट्याधीश झालेले असतात हे आपल्याला माहीत आहे. तथापि, स्वत:च्या कष्टाने वयाच्या 24 व्या वर्षी बचत करुन कोट्याधीश झालेले लोक संख्येने कमीच असतात. कारण एवढ्या कमी वयात स्वत:ची बुद्धी आणि कष्ट यांच्या जोरावर एवढी संपत्ती कमावणे ही सोपी बाब असत नाही. तेही एकवेळ शक्य आहे पण एवढ्या कमी वयात इतक्या मोठ्या रकमेची बचत करणे हे कदाचित अशक्यच मानले जाईल. तथापि, लंडनमध्ये वास्तव्यास असणारी मिया रोझ मॅकग्रेथ या 24 वर्षीय युवतीने हा बचतीच्या माध्यमातून कोट्याधीश होण्याचा मान मिळविला आहे.

फॅशन उद्योगात कार्यरत असणाऱ्या मॅकग्राथ हिने वयाच्या 14 व्या वर्षी दशकोट्याधीश होण्याचा पराक्रम केला आहे. इतकेच नव्हे, तर तिने आतापर्यंत केलेली बचतच एक कोटी रुपयांच्या पुढे आहे. एकवेळ कमी वयात स्वत:च्या कष्टावर कोट्याधीश होणे शक्य आहे, पण इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या कमी वयात बचत करणे हे ब्रिटनसारख्या देशात विशेष मानले जात आहे. कारण पाश्चिमात्य देशांमध्ये पैसा खर्च करणे हे प्रतिष्ठेचे मानले जाते. तेथे नागरीकांचा बचतीवर फारसा विश्वास नसतो. मोठ्या प्रमाणात पैसा मिळवा आणि तितक्याच मोठ्या प्रमाणात तो खर्च करा, अशी वृत्ती तेथे अधिक प्रमाणात आहे. अशा देशात एका युवतीने वयाच्या 24 व्या वर्षी एक कोटी रुपयांहून अधिक बचत करावी, याचे तेथे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. भारतात अशी बाब फारशी विशेष मानली जाणार नाही. कारण येथे अद्यापही बचत करण्याकडे खर्च करण्यापेक्षा लोकांचा कल अधिक असतो. त्यामुळे ब्रिटनमध्ये सध्या मॅकग्राथ ही युवती चर्चेत असून तेथील लोक तिच्या या बचतीच्या सवयीचा आचंबा करीत आहेत.

Comments are closed.