Mind Detox : डोक्यात सतत निगेटिव्ह विचार? असे करा माइंड डिटॉक्स

काही जणांच्या डोक्यात सतत निगेटिव्ह विचारांचं वादळ सुरू असतं. असा व्यक्तींमध्ये महिलांचे प्रमाण जास्त असते. स्वत:बद्दल, मुलांबाबत, घरच्यांबाबत त्या सातत्याने नकारात्मक विचारांमध्ये गुंतलेल्या दिसून येतात. आपल्या बाबतीत काहीच चांगले घडत नाही, सगळं वाईटच घडतं असा त्यांचा ठाम विश्वास असतो. ज्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर तर होतोच शिवाय त्यांच्या कुटूंबावर देखील होतो. अशा परिस्थितीत, ज्याप्रमाणे शरीराला विषारी घटकांपासून वाचण्यासाठी शरीराचे डिटॉक्स केले जाते, त्याचप्रमाणे मनालाही निगेटिव्ह विचारांपासून वाचवण्यासाठी माइंड डिटॉक्स करणे आवश्यक आहे. सतत कामाचा ताण, भविष्याचा विचार यामुळे मन थकून जाते. त्यामुळे शरीराप्रमाणे मनालाही आरामाची गरज असते. आज आपण माइंड डिटॉक्स करण्यासाठी डोक्यातील निगेटिव्ह विचारांना कसे पळवायचे याबाबत सोपे उपाय जाणून घेऊयात.

  1. जर डोक्यातील निगेटिव्ह विचार दूर करायचे असतील तर सर्वात आधी ते लिहून काढावेत. असे केल्याने तुम्ही करत असलेले विचार खरचं गरजेचे आहेत का? याचे उत्तर तुम्हाला मिळेल. दररोज काही दिवस हा उपाय सतत केल्याने डोक्यात निगेटिव्ह विचार येणार नाहीत.
  2. कामाचा ताण जास्त असेल तर स्वत:साठी 10 मिनिटे तरी वेळ काढा. या 10 मिनिटांमध्ये आवडती कोणतीही गोष्ट करा. यात तुम्ही नाचू शकता, फिरायला जाऊ शकता, गाणं म्हणू शकता. यामुळे मन रिलॅक्स होईल आणि निगेटिव्ह विचारांना थारा मिळणार नाही.
  3. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला यशाचं शिखर गाठायचं आहे. त्यामुळे प्रत्येकजण घड्याळ्याच्या काट्यावर धावत असून अतोनात मेहनत घेत आहे. या अथक परिश्रमांमुळे शरीरासोबतच मनानेही थकायला होत आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही मनाला विश्रांती मिळण्यासाठी आणि माइंड डिटॉक्सिफाय करण्यासाठी काही दिवस कामातून ब्रेक घ्यायला हवा.
  4. माइंड डिटॉक्स करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे मोबाईलपासून काही वेळ दूर राहा, आभासी जगापासून अंतर ठेवा. असे केल्याने मनाला आराम मिळेल.
  5. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर दैंनदिन आयुष्यात काही सवयी अंगी बाळगा. जसे की, सकाळचा नाश्ता, 10 ते 15 मिनिटे व्यायाम करणे, हेल्दी पदार्थ खाणे, वेळेवर झोपणे. असे केल्याने शरीराबरोबर मनही शांत राहील.
  6. रोजच्या कामांची यादी सकाळी उठल्यावर करावी. यामुळे तुम्हाला दिवसभरात कोणती कामे आधी करायची आहेत आणि कोणती नाहीत, हे लक्षात येईल. या ट्रिकमुळे मनावर कामाचे प्रेशर येणार नाही.

 

 

 

 

हेही पाहा –

Comments are closed.