चार्टर्ड अकाउंटंट असून क्रिकेटमध्ये जीव., गोलंदाजसाठी श्रेयस अय्यरने केली खास कृती!

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघ आता दुबईत आहे. भारतीय संघाला पुढचा सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळायचा आहे. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी साठी निवडलेला एक नेट गोलंदाजाच श्रेयश अय्यरने‌ मन जिंकल‌ आहे. श्रेयस आता भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकावर कमालीची फलंदाजी करत आहे त्याने आयसीसी क्रिकेट अकॅडमी मध्ये सरावाच्या दरम्यान नेट गोलंदाज जसकिरण सिंगला बूट गिफ्ट केले आहेत.

जसकिरण सिंग हा एक चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि त्याला क्रिकेटची खूप आवड आहे. न्यूज एजन्सी पीटीआय अनुसार जसकिरण लॉन्ग-ऑन ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता तेव्हा श्रेयस अय्यर त्याच्याजवळ आला आणि त्याला विचारले “पाजी काय चाललंय ? सगळं व्यवस्थित”.

श्रेयस अय्यर ने बूट गिफ्ट दिल्यानंतर जस किरण सिंग म्हणाला श्रेयस भाऊ माझ्याकडे आला आणि मला विचारले की माझ्या बुटाची साईज काय आहे? मी म्हणालो 10. श्रेयस म्हणाला माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी आहे तेव्हाच त्याने मला बूट गिफ्ट केला. हा क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान जसकिरण सिंगने पाकिस्तान आणि बांगलादेश खेळाडूंसाठी सुद्धा नेट गोलंदाजी केलेली आहे. जस किरण सिंग फिरकी गोलंदाजी करतो. जसकिरण सिंग त्यावेळी खूप निराश झाला होता जेव्हा भारतीय संघाला तो नेट्स मध्ये गोलंदाजी करू शकला नाही.

जसकिरण सिंग पुढे म्हणाला की श्रेयस अय्यर शी भेटून खूप छान वाटलं. तो म्हणाला जेव्हा भारतीय संघाचे फलंदाज जेव्हा एका पाठोपाठ एक बाद होतात तेव्हा श्रेयस अय्यरच योगदान भारतासाठी महत्त्वाचे ठरतं. श्रेयस ऐरणी पाकिस्तान विरुद्ध सामन्यात अर्धशतक केले होते.

हेही वाचा

रोहित शर्मा फिटनेस अपडेट: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज?

महान सचिन तेंडुलकरचा रेकाॅर्ड मोडण्याची रोहित शर्माला संधी! कर्णधार म्हणून करणार मोठी कामगिरी

जोस बटलरची जागा कोण घेणार? इंग्लंडच्या कर्णधारपदासाठी 3 प्रमुख दावेदार!

Comments are closed.